Hastag Tadev Lagan and Shree Ganesha Movie Review in Marathi

 हॅशटॅग तदेव लग्नम आणि श्री गणेशा मराठी सिनेमांचे रिव्ह्यू


या आठवड्यात मराठी बॉक्स ऑफिस वर दोन मराठी सीनेमे रिलीज झाले. एक म्हणजे प्रथमेश परबचा श्रीगणेशा आणि दूसरा सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांचा hashtag तदेव लग्नम. कोणताही वेळ न दवडता दोन्ही सिनेमांचे शॉर्ट आणि to the point review  आम्ही देणार आहोत. कुठला सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघू शकता आणि कुठला सिनेमा तुम्ही स्कीप करू शकता ते तुम्हाला समजेल. तर रिव्ह्यू सुरू करूया.


सिनेमा कोणी लिहिलाय कोणी डायरेक्ट केलाय ह्या फंदात न पडता आपण थेट कथा, पटकथा, acting, music, सिनेमॅटोग्राफी यावर फक्त बोलूया. तर पहिला रिव्ह्यू आपण करूया हॅशटॅग तदेव लग्नम या सिनेमाचा.
Hashtag ramdev lagnam movie review



Vastav tadev lagnam marathi movie review

अथश्री महाजन म्हणजे सुबोध भावे हा एक मराठी प्रोफेसर आहे  तो वयाच्या चाळीशी मध्ये असून तो अविवाहित आहे.  गायत्री म्हणजे तेजश्री प्रधान ही ४० असूनही ती सुद्धा अविवाहित आहे.
अथश्री आता पुन्हा लग्नासाठी तयार आहे. अनेक नकार पचवूनही, हताश न होता, नेमाने त्याचे वधूसंशोधन चालूच आहे.
दुसरीकडे, गायत्री लग्नाच्या विरोधात आहे, परंतु पालकांच्या आग्रहावरून ती अथश्रीला भेटण्याचा निर्णय घेते. ती अथश्रीला पहिल्या भेटीत थेट नकार देते. मात्र गायत्री त्याच्याशी मैत्री करण्याचा निर्णय घेते. असे अनेक प्रसंग येतात आणि ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवतात. एकमेकांना समजून घेतात. पुढे त्यांचे लग्न जुळते का हे पाहण्यासाठी सिनेमा पहावा लागेल.
या कथेवरूनच दिसते की कथेत काहीच नावीन्य नाहीये. मुंबई पुणे मुंबई ह्या सिनेमाचे उतारवयीन व्हर्जन आहे. फर्स्ट हाफ मध्ये ह्या दोन पात्राच्या भेटीतच संपतो. मध्ये मध्ये ह्युमर पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो मात्र screen play एवढा खराब आहे की फर्स्ट हाफ संपूर्ण बोरिंग होऊन जातो. सिनेमा थोडा फार तरला आहे तो दुसऱ्या भागात. दुसऱ्या भागात चित्रपटात काही भावनिक क्षण आहेत जे खरोखरच तुमच्या हृदयाला भिडतात. गाणी थोडी बरी आहेत मात्र कुठलेच गाणे लक्षात राहत नाही. पटकथा ठिक आहे पण खूपच प्रेडिक्टेबलही आहे. चित्रपट धोपट मार्गावर चालत राहतो आणि सर्व पेक्षक कंटाळून जातात.
अथश्री म्हणून सुबोध भावे यांनी चांगले काम केले आहे. तेजश्री प्रधान गायत्रीच्या रूपात पण चांगली वावरली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ठीक आहे पण मुळात ह्या कथेतच दम नाहीये.  त्यामुळे चित्रपत तेवढी उंची गाठत नाही. त्यामुळे हा सिनेमा टाळला तरी चालेल. आम्ही देतोय या सिनेमात पाच पैकी अडीच स्टार.

Shree ganesha marathi movie review
Shree ganesha marathi movie review


या दुसरा सिनेमा रिलीज झाला तो म्हणजे श्रीगणेशा.
टिकल्या म्हणजे प्रथमेश परब त्याचे वडील भाऊसाहेब पाटील म्हणजे शशांक शेंडे यांच्या बाप बेट्याच्या नात्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. बापाने टिकल्याला रिमांड होममध्ये पाठवले आहे कारण त्याने स्वतःच्याच घरात चोरी केली आहे. टिकल्याला त्याच्या प्रेयसीला म्हणजे सृष्टी मालवंडे हिला गिफ्ट द्यायला पैशांची गरज होती. म्हणून त्याने चोरी केली होती. रिमांड होम मध्ये राहून, टिकल्या सुधारला असे गृहीत धरून, भाऊसाहेब त्याला स्वतःच्या जोखमीवर घरी घेऊन जातात.
भाऊसाहेब त्याला घरी घेऊन जाण्यास तयार होतात कारण टिकल्याच्या आईला ब्रेन ट्यूमर आहे.  कोकणात त्यांच्या घरी जाताना, टिकल्या आणि भाऊसाहेब, दीपाली म्हणजे मेघा शिंदेला भेटतात. हा तिघांचा एका दिवसाचा प्रवास म्हणजे हा अख्खा सिनेमा आहे. इथे कथा जरी इंटरेस्टींग असली तरी पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहिती पडते. आणि चित्रपटही तसाच predictable आहे. हा संपूर्ण चित्रपट फक्त शेवट सोडला तर प्रचंड रटाळ कारभार आहे. कोकणात जातानाचा प्रवास दाखवताना सिनेमॅटोग्राफी एवढी बेकार आहे की युट्युबवरील एकदा vlog बघतोय असे वाटते. ह्या चांगल्या संधीची निर्मात्यांनी अक्षरशा माती केली आहे. त्यात मधेच आयटेम सॉंग टाकून आपलीच कबर खोदली आहे. त्यात पुन्हा continuty चा प्रॉब्लेम आहे. कथा एका दिवसाची आहे त्यामुळे चित्रपट जरी एका महिन्यात शूट केला असला तरी बघताना तो एका दिवसातच घडला आहे असे वाटणे गरजेचे आहे. केस दाढी या बाबतीत ती जागरूकता दिसत नाही. क्लायमॅक्सला वडीलमुलाच्या नात्याचा विषय नाजूकतेने हाताळला म्ह्णून थोडे पैसे वसूल होतात. नाहीतर हा सिनेमा मोफतही पाहू नये असाच आहे. त्यामुके हा सिनेमा 100 टक्के स्कीप केलाच पाहिजे असाच आहे.
टिकल्या म्हणून प्रथमेश परब याने चांगले काम केले आहे. भाऊसाहेब पाटील म्हणून शशांक शेंडे यांनीही चांगली भूमिका निभावली आहे. बाकीच्या पात्रांची कामे ठीक ठाक आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत, पटकथा सुमार आहे. या चित्रपटाला आम्ही देतोय दोन स्टार. एकूणच या आठवड्यात रिलीज झालेल्या दोन्ही सिनेमाने पार निराशा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने