Biography of Rohit Sharma,-रोहित शर्मा मराठी माहिती
रोहित शर्मा हा भारताचा आघाडीचा सलामीवीर फलंदाज आणि भारताचा विद्यमान कर्णधार आहे. नुकताच भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024चा टी ट्वेन्टी वर्ल्ड कप जिंकला. तसेच 2023विश्वकप मध्ये भारताने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती.
रोहित शर्मा हा त्याच्या हा नेहमीच फलंदाजीच्या आक्रमक शैलीसाठी सर्वत्र लोकप्रिय आहे. डावाच्या सुरवातीला आश्वासक सुरुवात करून नंतर वेगाने फलंदाजी करायला त्याला विशेष आवडते. त्याचे उंतुंग षटकार बघण्यासारखे असतात. लवकरच तो शहीद आफ्रिदीला मागे टाकून सिक्सर किंग बनणार आहे.
एकदिवसीय असो वाट कसोटी या दोन्ही प्रकारात सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम त्याच्या नावे असणार आहे. त्याचा आवडता शॉट पूल शॉट असून ह्या शॉट वर त्याने अनेक गगनचुंबी षटकार खेचले आहेत. सार्वधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचे नाव सर्वात वरती आहे. ह्याच आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने भारताने अनेक सामने एक हाती जिंकून दिले आहेत.
रोहितला प्रामुख्याने फास्ट गोलंदाजी खेळायला आवडते त्यामुळे ऑस्ट्रेलिया,इंग्लंड साऊथ आफ्रिका अशा बलाढ्य देशांसोबत त्याला फलंदाजी करायला विशेष आवडते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये (264 वि श्रीलंका) एका डावात फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीमुळे रोहितला 'हिटमन' असे टोपणनाव देण्यात आले. मुंबई इंडियन्स साठी त्याने सर्वाधिक पाच वेळा आयपीएल जिंकून दिली आहे.
Rohit Sharma Mahiti Marathi
- पूर्ण नाव- रोहित गुरुनाथ शर्मा (rohit sharama)
- जून - 30 एप्रिल 1987(37वर्ष वय)
- उंची- 5 फूट 10 इंच (1.78 मीटर)
- राष्ट्रीयत्व- भारतिय
- भूमिका- कर्णधार,टॉप-ऑर्डर बॅट्समन, ऑफ ब्रेक बॉलर
- नातेवाईक -पूर्णिमा शर्मा (आई), गुरुनाथ शर्मा (वडील), विशाल शर्मा (भाऊ), रितिका सजदेह (जोडीदार)समायरा शर्मा(मुलगी)
- आवडता शॉट- पूल हुक
- आवडते ग्राउंड - ईडन गार्डन, कोलकाता
रोहित शर्माच्या नावावर असलेले रेकॉर्ड - rohit sharma's records list
- एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा - 264.
- एकदिवसीय सामन्यात तीन दुहेरी शतके असणारा एकमेव खेळाडू.
- सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज-कसोटी आणि ट्वेन्टी ट्वेंटी एकदिवसीय दुसऱ्या स्थानी
- सर्वधिक षटकार मारणारा जगातील एक क्रमांकच खेळाडू- एकूण षटकार-620(t20+test+ODI)
- क्रिकेटच्या सर्व स्वरूपात (टेस्ट,एकदिवशीय, ट्वेंटी -ट्वेंटी )शतकांसह दुसरा भारतीय (सुरेश रैना नंतर ).
- एका आयसीसी विश्वचषकातील सर्वाधिक शतके- 5 (2019)
रोहित शर्माच्या करिअर विषयी माहिती- Rohit Sharma Career Information
फर्स्ट क्लास करिअर- first class career of rohit sharma
रोहित शर्माच्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरवात मार्च २००५मध्ये झाली. त्याच वर्षी मध्ये रोहितने पश्चिम झोनकडून देवधर करंडक स्पर्धेतील मध्य विभागा विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
याच स्पर्धेत शर्माने उदयपूर येथे उत्तर विभागाविरुद्धच्या 123 चेंडूंत 122 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीने त्याने सिलेक्टर्स चे लक्ष वेधून घेतले.
यामुळे शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अबुधाबी येथे भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आणि थेट आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी शर्माला अंतिम 30 जणांच्या यादीमध्ये तो पोहोचला. मंत्र तो पण तो अंतिम अकरा मध्ये पोहोचू शकला नाही.
पदार्पण
राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याचे त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. नंतर
त्याची निवड भारत अ संघासाठी झाली.जुलै २००६ मध्ये डार्विन येथे झालेल्या पहिल्या श्रेणी सामन्यात शर्माने न्यूझीलंड ए विरुद्ध भारत ए सामन्यात भारताच्या अ संघाकडून पदार्पण केले.
काही महिन्यांनंतर, रोहितने मुंबईला रणजी करंडक 2007 जिंकून दिला. त्याने आपल्या संघासाठी मोठे योगदान दिले. मुंबई रणजी टीमचा तो अविभाज्य भाग राहिला.
त्यानंतर रोहित शर्मा त्याच्या संपूर्ण उर्वरित कारकिर्दीसाठी मुंबईच्या रणजी करंडक संघाचा एक भाग राहिला . अजित आगरकर यांच्या निवृत्तीनंतर २०१३-१४ च्या मोसमात रोहितला मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.
रोहित शर्माची आयपीएल मधील कामगिरी- rohit sharma IPL record and achievements information
रोहित शर्माची आयपीएलमधील कारकीर्द आतापर्यंतची कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात यशस्वी कारकीर्द आहे. कर्णधार म्हणून त्याने मुंबई संघासाठी स्वप्नवत कामगिरी केली आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने तब्बल पाच वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. शर्मा ने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. सुरवातीला हैदराबाद येथे डेक्कन चार्जर्स फ्रँचायझीने त्याला करारबद्ध केले होते.
त्याच्या या करारामुळे त्याला वर्षाकाठी तब्बल 750000 डॉलर्स मिळाले. फलंदाज म्हणून त्याची निवड झाली असली तरी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिकघेऊन सर्वांना धक्का दिला. अशा गोलंदाज म्हणूनही त्याने आपली योग्यता सिद्ध केली.
रोहित शर्माची हॅट्ट्रिक
त्याने अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि जेपी ड्यूमिनी यांना बाद केले आणि हॅट्ट्रिक साजरी केली.
पुढच्या आयपीएलच्या लिलावात शर्माला मुंबई इंडियन्सने २ दशलक्ष डॉलर्सचा करार करून खरेदी केले . तेव्हापासून तो मुंबई फ्रॅंचायझीसोबत आहे.
शर्माने वैयक्तिकरित्या आयपील मध्ये साडेसहा हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि विराट कोहली(8000) आणि नंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय करिअर- Rohit Sharma International Career Information
रोहित शर्माचे वनडे करिअर- rohit sharma ODI career recordरोहित शर्माची 2007 मध्ये एकदिवसीय संघामध्ये निवड झाली. रोहितने 23 जून 2007 रोजी बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला.
त्यालासातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला लागत असल्यामुळे भारताच्या या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर शर्माला अधूनमधून संघातून वगळण्यात आलं होतं पण शेवटी ते प्रत्येक वेळी चांगली कामगिरी करून पुन्हा संघात प्रवेश मिळवत राहिला .
त्याचे संघात आता बाहेर चालू होती. परिणामी तो 2011 वर्ल्ड कप संघाचा भाग बनू शकला नाही 2012 सालही त्याच्यासाठी चांगले नव्हते.या वर्षी शर्माने संपूर्ण कॅलेंडर वर्षात केवळ १६८ धावा केल्या.
रोहित शर्माची शिखर धवनबरोबरची सलामीची जोडी ही सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरनंतर भारताची दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी सलामीची जोडी आहे.
भारतीय नंबर 3 फलंदाज विराट कोहलीसोबत भागीदारीतही रोहित शर्मा चांगली कामगिरी करतो.एकदिवसीय सामन्यात कोहली-रोहित जोडीची सरासरी 65 हून अधिक आहे.
2011च्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत महेंद्र सिंग धोनीने रोहित शर्माला शिखर धवनच्या साथीने भारतीय डावाची सलामी करायची संधी दिली. यामुळे रोहित शर्माला आपली योग्यता सिद्ध करायची संधी मिळाली.
13नोव्हेंबर 2014रोजी शर्माने एकाच डावात सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर नोंदविला. कोलकाताच्या ईडन गार्डन येथे श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूत त्याने 264 धावा केल्या. शर्मा आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये सर्वाधिक धावा काढून गोल्डन बॅटचा पुरस्कार मिळवला.
2021 साली विराट कोहलीने कप्तानी सोडली आणि रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड झाली. कर्णधार म्हणून तयार उत्तम कामगिरी केली. कर्णधार पदाच्या काळात त्याचा खेळ आणखी बहरला.
2023 च्या वर्ल्डकप मध्ये त्याने सुरवातीला आक्रमक बॅटिंग करून सर्व सामन्यात भारताला दमदार सलामी दिली. अंतिम सामना वगळता बाकीचे नऊही सामने भारताने जिंकले.
रोहित शर्माची कसोटी कारकिर्त - rohit sharma test career information
रोहितला कधीही कसोटी क्रिकेटचा योग्य फलंदाज मानल जात नव्हत. त्याच्याकडे तंत्रशुध्द बॅटिंग नव्हती तसेच एकदिवसीय क्रिकेट मध्ये संघात पक्के स्थाननव्हते.
त्यामुळे कसोटी पदार्पण उशिरा झाले. तब्बल सहा वर्षांनी नोव्हेंबर 2013 मध्ये रोहितने कसोटी सामन्यात पदार्पण केले. सचिन तेंडुलकर निवृत्त झाला तेव्हा ही मालिका झाली होती.
रोहितने त्याच्या आवडत्या कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पण सामन्यात त्याने 177 धावा केल्या. शिखर धवनने त्या सामन्यात 187 धावा केल्या. पुढच्या सामन्यात रोहितने आणखी शतक झळकावले.आणि दिमाखात कसोटी कारकिर्दीची सुरवात केली.
कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे शर्माला कसोटी संघातून वगळण्यात आले. 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी शर्माची निवड झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
2020-21 सालच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी साठी शेवटच्या दोन सामान्यासाठी तो उपलब्ध होता. हि मालिका भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळली आणि सर्वाना आश्चर्याचा धक्का देत हि मालिका जिंकली.
रोहित शर्माचे टी -20 आंतरराष्ट्रीय करिअर- rohit sharma T-20 career information
आयपीएल मध्ये रोहित एक विजेता कर्णधार म्हणून उदयास आला. २०१३ मध्ये शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले आणि पहिल्याच सिरीज मध्ये त्याने मुंबई संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले .
रोहित शर्माने कर्णधार या नात्याने मुंबईला तब्बल ५ वेळा आयपीएल जिंकून दिली आहे. २०१३मध्ये मध्ये चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी -२० स्पर्धेसाठी त्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आणि ती स्पर्धा जिकली.
कर्णधार म्हंणून रोहित शर्माची कामगिरी- Rohit Sharma as Indian Team Captain
रोहित शर्माने कर्णधार म्हणून भारताला कसोटी चॅम्पियनशीप मध्ये फायनला नेले मात्र अस्ट्रेलिया समोर भातातला हार पत्करावी लागली.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 चा t20 विश्वचषक जिंकला आहे.
विराट कोहलीने धोनीकडून कर्णधारपदाची धुरा घेतल्यावर लगेच रोहितला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला टीम श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती तेव्हा डिसेंबर २०१७ मध्ये शर्माला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. हि मालिका भारतीय संघाने मालिका २-१ने जिंकली.
रोहितने कर्णधार म्हणून निदाहास ट्रॉफीमध्येही भारताला विजय मिळवून दिला आहे.
कोहली नंतर पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहितची निवड झाली. त्यानेही साजेशी कामगिरी करत भारताला अनेक विजय मिळवून दिले. कसोटी चॅम्पियनशीप फायनल, वर्ल्डकप फायनल आणि T20 चे विश्वविजेते पद हे त्याने कर्णधार म्हणून गाठलेली शिखरे आहेत.
रोहित शर्माचे कुटुंब, पत्नी माहिती- Rohit Sharma Family, Wife Information
रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८६ रोजी महाराष्ट्रातील नागपूर, बनसोड येथे पूर्णिमा शर्मा आणि गुरुनाथ शर्मा याच्या पोटी झाला. रोहितचे वडील ट्रान्सपोर्ट फर्म स्टोअरहाऊसचे केअर टेकर म्हणून काम करत होते.
त्याच्या वडिलांकडे रोहितला पुरेसे स्थैर्य देण्यासाठी पु आर्थिक साधन नव्हते म्हणूनच त्यांचे पालनपोषण बोरिवलीतील आजी आजोबा आणि काका यांनी केले.
रोहितचे बालपण मुख्यत्वे मुबंईला गेले. येथे त्याला क्रिकेट मध्ये करियर करायला वाव मिळाला.रोहितचे पालक फक्त शनिवार व रविवार दरम्यान रोहितला भेटायचे ते डोंबिवलीत एका खोलीच्या घरात राहत होते.
रोहितला विशाल नावाचा एक छोटा भाऊ आहे. रोहित शर्माच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह असून दोघांनी २०१५ मध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला.
त्यांना एक सुंदर मुलगी आहे, तिचे नाव समायरा शर्मा आहे. रोहित शर्मा फॅमिली मॅन म्हणून ओळखला जातो. त्याची पत्नी बरेच वेळा मॅच पाहायला ग्राउंड वर आलेली पाहायला मिळते.
रोहित शर्माची बायको- rohit sharma wife
रितिका ही एक प्रसिद्ध स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर आणि रोहित एक प्रसिद्ध क्रिकेटर असल्यामुळे यांच्या पहिल्या भेटीच कारण हे केवळ व्यावसायिकच होते.
एकमेकांच्या सातत्याने होणाऱ्या भेटी गाठीनंतर मैत्री आणि मग या दोघांच्या प्रेमाचे सूत जुळलं. प्रेमाचा प्रवास सुरु करण्याआधी रोहित आणि रितिका 6 वर्षे एकमेकांचे चांगले मित्र होऊन वावरत होते.
फार कमी लोकांना माहीत असेल की, केवळ रोहितच नाही तर रितिकाही क्रिकेटशी कनेक्ट असणारा चेहरा आहे. रितिका स्वतः क्रिकेटर नाही तर ती एक प्रसिद्ध स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर आहे जी दीर्घकाळापासून या क्षेत्रात सक्रिय आहे.
रितिका प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सजदेहची चुलत बहीण आहे. ती बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची जवळची मैत्रीण आहे, ज्यामुळे ती बॉलिवूड वर्तुळात खूप लोकप्रिय आहे. फार कमी लोकांना माहित असेल की रितिका प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंगची मानलेली बहीण आहे.
लग्न
13 डिसेंबर 2015 रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली. मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये झालेला हा विवाह एका बिग बजेट ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी नव्हता कारण त्यांच्या लग्नात क्रिकेट, बॉलीवूड आणि व्यावसायिक जगतातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
Rohit sharma house address
- रोहित शर्माच्या घराचा पत्ता
रोहित शर्मा,29वा मजला,
अहुजा टॉवर
वरळी मुंबई
- रोहित शर्माच्या घराचा पत्ता(आजोळ)
रोहित शर्माचे बालपण येथे गेले
12, दुसरा मजला,
तपोवन सोसायटी, आसरा कॉलोनी
बोरिवली ईस्ट
मुंबई
रोहित शर्मा एकूण संपत्तीविषयी माहिती -Rohit Sharma Net Worth and salary
रोहित शर्मा सध्या बीसीसीआयने निर्दिष्ट केलेल्या खेळाडूंच्या ए + ग्रेडमध्ये आहे, जो त्याला दर वर्षी 25 कोटी मिळतात. हा झाला .(salary of rohit sharma) एवढे पैसे पगार म्हणून मिळतात.
रोहित शर्माला बीसीसीआयकडून सामना शुल्क म्हणून खेळल्या जाणार्या प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 20 लाख,
एकदिवसीय प्रति आयएनआर 9 लाख आणि टी -20 आय सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात.
आयपीएल मध्ये त्याला मुंबई इंडियन 20 करोड रुपये मानधन देते
रोहित शर्मा जाहिराती आणि उत्पन्न- rohit sharma earnings and salary
रोहित शर्मा सध्या स्वतंत्रपणे १२ वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती करतो आणि जियो आणि व्हिडिओकॉन डी टू एचसारख्या कंपन्यांनी आयपीएलच्या फ्रेंचायझी संघ मुंबई इंडियन्सशी करार केला आहे.
रोहितच्या मान्यताप्राप्त ब्रॅण्डमध्ये मॅगी, लेस, निसान, सिएट, एरिस्टोक्रॅट, आडिडास, रीलिस्प्रे, नॅसिव्हियन नेसल स्प्रे, ओप्पो, हाईलँडर्स आणि हुबलोट यांचा समावेश आहे.
रोहित शर्माची एकूण संपत्ती 300 करोडच्या वर आहे
रोहित शर्माला मिळालेल्या पुरस्कार विषयी माहिती- Rohit Sharma Awards List Information
- रोहित शर्माला 2015 मध्ये ‘अर्जुन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
- आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये सर्वाधिक धावा केल्याबद्दल गोल्डन बॅट पुरस्कार प्रदान.
- 2020 मध्ये रोहित शर्माला देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान- राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
आशा आहे तुम्हाला हे रोहित शर्माचे चरित्र( biography of rohit sharma) आवडले असेल. रोहित शर्माची माहिती(rohit sharma mahiti) जास्तीत जास्त योग्य प्रकारे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या वेबसाईट वरील इतर लोकांचे चरित्र वाचायलाही विसरू नका.