प्रतिज्ञा कोणी लिहीली ?-pratidnya koni lihili?, who wrote pledge ? भारत देश आहे कोणी लिहिली
भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कोणी लिहिली
नुकताच आपण आपल्या देशाचा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. पण आपल्या देशाबाबतच्या अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठाऊक नसतात आणि आपण त्या जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही.
आपल्या राष्ट्रगीतचे कवी रवींद्रनाथ टागोर आहेत हे आपल्याला माहिती असेलच. नक्की माहीत होते ना!
आता सांगा वंदे मातरम कोणी लिहिले?
जरा डोकं लावा विचार करा. हुशार लोकांनी कमेंट मध्ये लिहा. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत सोडून आणखी एक गोष्ट आहे जी राष्ट्रप्रेमाशी निगडित आहे. ती म्हणजे प्रतिज्ञा!
आपल्या देशातील सर्व पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापण्यात आलेली असते. त्याचप्रमाणे शाळा भरताना जेव्हा राष्ट्रगीत होतं त्यावेळीही प्रतिज्ञा बोलायला सांगण्यात येते.
सर्वांना ती तोंडपाठ असते. आहे ना तोंडपाठ? एकदा प्रयत्न करून बघा. पण आपल्या मनात हा विचार कधी आला की ही आपल्या स्वतंत्र भारताची ही राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?
(pratidnya koni lihili), हे अद्याप आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नाही. चला तर मग शोधून काढुया. प्रतिज्ञा कोणी लिहली? त्यासाठीच तर हा लेखनप्रपंच मांडलाय.
lets find out who wrote indian pledge- pratidnya koni lihili
भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कोणी लिहिली?
भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यानी प्रतिज्ञा लिहीली
पेदेमरी व्यंकट सुब्बाराव हे नक्की कोण होते.
बहुतेक लोकांनी हे नाव पहिल्यांदा ऐकले असेल. चला त्यांच्याविषयी थोडी माहिती गोळा करू.
पेदेमरी व्यंकट सुब्बारावहे आंध्र प्रदेशमधील सुप्रसिद्ध तेलगु साहित्यिक होते. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेमध्ये आपल्या स्वतंत्र भारताची पहिली प्रतिज्ञा लिहीली होती. म्हणजे पहिली प्रतिज्ञा मूळ तेलगू भाषेत आहे. पण अद्याप स्पष्टपणे कुठेही त्यांचा लेखक म्हणून नावाचा उल्लेख आढळून येत नाही.
सुब्बाराव यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावात झाला होता. त्यांनी संस्कृत, तेलगु, इंग्रजी आणि अरेबिक या भाषांमधून आपलं पदव्युत्तर पदवी घेतली होती.
त्यांचे एक कार्य विशेष आहे ते म्हणजे त्यांची ‘कालाभरवाहू’ नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. ते महान राष्ट्रभक्त होते. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता.
याच देशप्रेमात त्यांनी भारत माझा देश आहे अशी सुरवात करून प्रतिज्ञा लिहिली. नव्या युगातील मुलांना शाळेत देशप्रमेमाचे आणि संस्कारांचे बाळकडू पाजावे म्हणून त्यांनी ही प्रतिज्ञा लिहिली.
कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा (partidnya lihili) 1962मध्ये लिहिली होती.
ही प्रतिज्ञा लोकांपर्यत पोहचविण्यात त्यांच्या मित्राचा वाटा मोठा आहे. सुबा यांच्या मित्राने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखवली. त्यांना ही प्रतिज्ञा फार आवडली.
त्यानंतर त्यांनी प्रत्येक शाळांमध्ये ती प्रतिज्ञा घेण्याचा आदेश दिला. आणि शाळेत ही प्रतिज्ञा म्हणू जाऊ लागली.
पुढे डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया या समितीच्या शिफारशीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी असे ठरले.
याकरता सुब्बाराव यांच्या तेलगु प्रतिज्ञेचे भाषांतर करून India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
देशपातळीवर ही प्रतिज्ञा पोहोविण्याचे ठरले. पुढे असेही सूचित करण्यात आले की, ही प्रतिज्ञा देशपातळीवर 26 जानेवारी 1965 पासून लागू करावी असेही सुचवण्यात आले.
त्यानंतर या प्रतिज्ञेचे देशातील सर्व भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. त्यानंतर ती सर्व पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानावर छापण्यात आली.
शाळेत अथवा कॉलेज मध्येराष्ट्रगीता नंतर प्रतिज्ञा म्हटली जाऊ लागली. ती केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादीत न ठेवता. तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देण्यात आला.
प्रतिज्ञा ही सर्वधर्म समभाव, बंधुता, राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रवाद या मूल्यांचा पुरस्कार करते.
तर ही प्रतिज्ञा आपण मराठी भाषेत पाहू.
तर ही प्रतिज्ञा आपण मराठी भाषेत पाहू.
मराठी प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
प्रतिज्ञा हिंदी मध्ये
भारत मेरा देश है | हम सब भारतवासी भाई बहन हैं |
मुझे अपना देश प्राणों से भी प्यारा है |
इसकी समृद्धि और विविध संस्कृति पर मुझे गर्व है |
हम इसके सुयोग्य अधिकारी बनने का सदा प्रयत्न करते रहेंगे |
मैं अपने माता-पिता, शिक्षकों एवं गुरुजनों का सदा आदर करुँगा और सबके साथ शिष्टता का व्यवहार करुँगा |
मैं अपने देश और देशवासियों के प्रति वफादार रहने की प्रतिज्ञा करता हूँ |
उनके कल्याण और समृद्धि मेंही मेरा हित समाया हुवा है।
आता प्रतिज्ञेचे इंग्लिश भाषांतरण पाहू
मुझे अपना देश प्राणों से भी प्यारा है |
इसकी समृद्धि और विविध संस्कृति पर मुझे गर्व है |
हम इसके सुयोग्य अधिकारी बनने का सदा प्रयत्न करते रहेंगे |
मैं अपने माता-पिता, शिक्षकों एवं गुरुजनों का सदा आदर करुँगा और सबके साथ शिष्टता का व्यवहार करुँगा |
मैं अपने देश और देशवासियों के प्रति वफादार रहने की प्रतिज्ञा करता हूँ |
उनके कल्याण और समृद्धि मेंही मेरा हित समाया हुवा है।
आता प्रतिज्ञेचे इंग्लिश भाषांतरण पाहू
प्रतिज्ञा इंग्लिश मध्ये
Pledge in english“India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country, and I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it. I shall give my parents, Teachers and all elders respect and treat every one with courtesy. To my Country and my people, my devotion. In their well – being and prosperity alone lies my happiness.”
सुब्बाराव यांची त्यांनी मूळ तेलगू भाषेत लिहलेली प्रतिज्ञा
originl Indian National Pledge in Teluguభారతదేశము నా మాతృభూమి.
భారతీయులందరు నా సహోదరులు.
నేను నా దేశమును ప్రేమించుచున్నాను.
సుసంపన్నమైన, బహువిధమైన నాదేశ వారసత్వసంపద నాకు గర్వకారణము.
దీనికి అర్హుడనగుటకై సర్వదా నేను కృషి చేయుదును.
నా తల్లిదండ్రులను, ఉపాధ్యాయులను, పెద్దలందరిని గౌరవింతును.
ప్రతివారితోను మర్యాదగా నడచుకొందును.
నా దేశముపట్లను, నా ప్రజలపట్లను సేవానిరతి కలిగియుందునని ప్రతిజ్ఞ చేయుచున్నాను.
వారి శ్రేయోభివృద్ధులే నా ఆనందమునకు మూలము.
प्रतिज्ञेचा आशय
भारत माझा देश आहे. ही प्रतिज्ञा अत्यंत तरल आणि सोप्या शब्दात लिहिली गेली आहे. त्यामुळे तिचा अर्थ समजणे फार सोपे आहे मात्र प्रतिज्ञच्या मागे जो आशय आहे तो समजून घेणे जास्त अपेक्षित आहे.ही प्रतिज्ञा म्हणजे विवेकवादी,समता, बंधुता, एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ आहे. ही भावना प्रत्येकाने समजून घेईली पाहिजे. प्रतिज्ञेमागचा विचार आपल्या अंगी बानवला पाहिजे.
हा वारसा भविष्यातही भावी पिढ्यांसाठीही मार्गदर्शनपर ठरणार आहे. येणाऱ्या काळात सुदृढ नवी पिढी घडविण्यासाठी ही प्रतिज्ञा उपयोगी येईल. त्यासाठी प्रतिज्ञेचा आशय समजून घेणे आवश्यक आहे.
प्रतिज्ञेच्या अनुषंगाने जबाबदारी
सध्याच्या युगात नवीन पिढीला योग्य मार्ग दाखवणे गरजेचे आहे. नितीमूल्याणचा ऱ्हास होत आहे. समता, बंधुता, ऐक्य लयाला जात आहे. मानवाचे अधःपतन होत आहे. यातून वाईट संदेश नवीन पिढीकडे जात आहे.
ह्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ समजून घेऊन तो नव्या पिढीकडे हस्तांतरित होणे अपेक्षित आहे.ही प्रतिज्ञा फक्त पाठ न करता अथवा पाठ्यपुस्तकात फक्त शोभा वाढवण्यापुरती मर्यादित न राहता तिचा खरा अर्थ नव्या पिढीवर बिंबवणे गरजेचे आहे.
ही फक्त शाळा अथवा शिक्षकाची जबाबदारी नसून प्रत्येक पालकाचीही तेवढीच जबाबदारी आहे.
तसेचआपल्याला अशी यथायोग्य प्रतिज्ञा लिहून देणाऱ्या पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांचा सन्मान आपण केला पाहिजे. कृतज्ञता म्हणून निदान त्यांचे नाव लक्षात ठेवायचा तरी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो.
अपेक्षा आहे तुमच्या प्रतिज्ञा कोणी लिहली(pratibha koni lihili) या प्रश्नाच उत्तर तुम्हाला मिळालं असेल. अशाच प्रकारची आणखी सविस्तर माहिती माहिती आमच्या या वेबसाइट वर उपलब्ध आहे ती नक्की वाचा धन्यवाद.