Marathi Letter Format With Formal and Informal Examples
पत्रलेखन हा कोणत्याही भाषेतील अविभाज्य भाग आहे. प्राचीन इतिहासापासून आतापर्यंत पत्रलेखनाचे स्वरूप बदलत राहिले आहे मात्र त्याचे महत्व कायम राहिले.
शालेय विद्यार्थ्यांना पत्रलेखन यायलाच हवे. कारण अजूनही अनेक ठिकाणी formal आणि informal पत्रे लिहावी लागतात.
शाळेत पत्रलेखनासाठी विशेष मार्क्स असतात. हे सहज सोपे आणि हमखास मिळणारे मार्क्स विद्यार्थ्यांनी अजिबात सोडू नये.
ज्या मुलाना पत्रलेखन अवघड जाते त्यांनी हा लेख नक्की वाचवा. शालेय विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता हा लेखन प्रपंच मांडला आहे.
Formal and Informal Letter writing in marathi
पत्रलेखन म्हणजे एक कला आहे ज्यात आपण आपल्या मनाची भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो.
कधीकधी असे होते जेव्हा आपण व्यक्तीस आपल्या मनात उद्भवलेल्या विचारांचे आणि भावना व्यक्त करू शकत नाही, तर आम्ही त्या भावना आणि विचारांना पत्राने सहजपणे व्यक्त करू शकतो.
शब्दांद्वारे व्यक्त केलेले भाव नेहमी आपल्यासोबत असतात.
हृदयाशी जोडण्यासाठी, माहितीचे देवाणघेवाण करणे, समाजात जागरुकता पसरविणे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
Marathi Letter Writing Introduction
पत्रलेखनाचा प्रमुख हेतू जे प्रत्यक्षात बोलून दाखविणे शक्य नसते, ते लिहून कळविणे हाच असला, तरी पुष्कळसा पत्रव्यवहार हा लिखित स्वरूपातच असणे आवश्यक मानले जाते.
पहिल्या प्रकारात बहुतेक सर्व खाजगी पत्रलेखन व दुसऱ्या प्रकारात बहुतेक सर्व व्यावसायिक पत्रलेखन अंतर्भूत होते.
खाजगी पत्रलेखन हे खाजगी संभाषणासारखे असून त्यातून विशिष्ट निमित्ताने केलेले अनौपचारीक व मनमोकळे निवेदन आढळते.
पत्रलेखक व पत्रवाचक यांच्यात ज्या प्रकारचे संबंध असतील, त्यांवर या निवेदनाचा आशय व भाषाशैली अवलंबून असतात.
खाजगी पत्रांतही औपचारिक प्रश्नोत्तरे संभवतातच पण त्यांतून व्यक्तिगत जवळीकच व्यक्त होते.
व्यावसायिक पत्रलेखनाची व्याप्ती फार मोठी आहे.
नोकरीसाठी अर्ज, शासकीय कार्यालयातून व खाजगी संस्थांतून केला जाणारा विविध प्रकारचा पत्रव्यवहार तसेच व्यापारी कंपन्या, छोटेमोठे दुकानदार, कारखानदार, बँका यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या घटकांचा पत्रव्यवहार या सर्वांचा अंतर्भांव व्यावसायिक किंवा सार्वजनिक पत्रलेखनात होतो.
हे पत्रलेखन सामान्यतः औपचारिक स्वरूपाचे असते. त्यातील एक भाग हा प्रपत्ररूप असतो. त्याची लेखनपद्धती ठराविक प्रकारचीच असते.
आधुनिक ⇨सचिवीय पद्धतीत पत्रलेखन अथवा मसुदालेखन यांना काटेकोर औपचारिक स्वरूप प्राप्त झालेले आहे.
खाजगी व व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रांत ओळखपत्र, शिफारसपत्र, अधिकारपत्र, पोचपत्र इ. तसेच नोकरीसाठी करावयाचे अर्ज यांसारख्या अनेक बाबतींत विहित नमूने रूढ झालेले दिसून येतात [⟶मसुदालेखन व टिपणी].
पत्रलेखनाचा प्रकार इतरही काही उद्दिष्टांनी हाताळण्यात येतो.
पत्ररूप कथाकादंबऱ्या, पत्ररूप वैचारिक लेखन, वृत्तपत्रे व नियतकालिके यांतून जाहीरपणे प्रसिद्ध होणारी वाचकांची पत्रे व विशिष्ट व्यक्ती वा संस्थाना उद्देशून लिहिली जाणारी अनावृत पत्रे वा काल्पनिक पत्रे इ. प्रकारांतून पत्रलेखनाचे औपचारिक तंत्र वापरलेले असते.
लेखक, कवी, कलावंत, राजकीय नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांची खाजगी पत्रे संग्रहरूपाने प्रसिद्ध करण्यात येतात.
त्यांचा उपयोग संबंधित अभ्यासकांना होतो. इतिहासकालीन पत्रव्यवहार हादेखील इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्वाचे साधन मानले जाते.
Marathi Letter Writing components
कोणत्याही खाजगी वा व्यावसायिक पत्राचे स्थूलमानाने पाच घटक असतात.
(१) पत्रशीर्ष :
पत्रलेखकाचे नाव, पत्ता व पत्राची तारीख हा तपशील सामान्यत: पत्राच्या वर उजव्या कोपऱ्यात लिहिण्याची पद्धत आहे.
हाच मजकूर यापेक्षा वेगळ्या रीतीने कलात्मक छपाई करून अशी छापील पत्रशीर्षे वापरण्याची पद्धत रूढ आहे.
पत्राच्या वरच्या टोकाला अगदी मधोमध सुभसूचक असा ‘श्री’ वा तत्सम निर्देश लिहिण्याची प्रथा आढळते
(२) सुरुवातीचा मायना:
खाजगी पत्रातील मायने हे पत्रलेखक-पत्रवाचक यांच्या कौटुंबिक नात्यांवर किंवा इतर प्रकारच्या संबंधावर अवलंबून असतात.
पारंपरिक पत्रलेखनात आईवडिलांना तीर्थरूप, इतर वडीलधाऱ्यांना तीर्थस्वरूप, कनिष्ठ व्यक्तीस चिरंजीव, बरोबरीच्या मित्रमैत्रिणींना प्रिय असे संबोधून त्याखाली कृतानेक शिरसाष्टांग दंडवत किंवा नमस्कार, अनेक आशीर्वाद, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष यांसारखी अभिवादनपर वचने योजतात.
आधुनिक पत्रलेखनात सामान्यतः ज्येष्ठांना सादर व समवयस्कांना व कनिष्ठांना सप्रेम नमस्कार एवढाच मायना पुरतो. तीर्थरूप व तीर्थस्वरूप ही आदरार्थी वचने मात्र आधुनिक पत्रलेखनात टिकून आहेत
तथापि ‘प्रिय’ हेच संबोधन सर्रास वापरण्याची प्रथा बहुधा ‘डियर’ या इंग्रजी मायन्याच्या अनुकरणाने लोकप्रिय झालेली दिसते. व्यावसायिक पत्रांचे मायने औपचारिक असतात.
‘महोदय’- सारखा निर्देश त्यात पुरेसा असतो. मायना लिहिण्याच्या पूर्वी पुष्कळदा पत्राचा विषय आणि पूर्वकालीन पत्राचा संदर्भ एकाखाली एक देण्याची पद्धत आढळते
(३) मसुदा :
हा पत्राच्या मजकुराचा भाग असतो. सामान्यपणे सुस्पष्टता, समर्पकता, संपूर्णता, सविनयता, संक्षिप्तता, संभाषणात्मकता व समंजसपणा असे सप्त ‘स’ गुण पत्राच्या मजकुरात असावेत अशी अपेक्षा असते
(४) समाप्तीचा मायना :
पत्राचा मजकूर समाप्त झाल्यावर स्वतःची स्वाक्षरी करण्यापूर्वी पत्रलेखकाला समाप्तीचा मायना लिहावा लागतो.
आईवडिलांना व इतर वडीलधाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा शेवट पुष्कळदा ‘आपला आज्ञाधारक’ या वचनाने केला जातो.
याशिवाय ‘आपला’, ‘आपलाच’, ‘तुझा’, ‘तुझाच’, ‘आपला स्नेहांकित’, ‘आपला स्नेहाकांक्षी’ असेही समाप्तिचे मायने वापरले जातात.
व्यावसायिक पत्रलेखनात ‘आपला’, ‘आपला विश्वासू’ यांसारखे प्रयोग केले जातात
(५) स्वाक्षरी :
पत्राच्या शेवटी उजव्या बाजूला खाली पत्रलेखकाची स्वाक्षरी असते.
पत्र लिहिण्यासाठी महत्वाच्या गोष्टीः
मराठी पत्र कसे लिहावे
Marathi letter writing- important basic things
पत्र लिहिण्यासाठी महत्वाच्या गोष्टीः
मराठी पत्र कसे लिहावे
(1) ज्यासाठी पत्र लिहिले आहे, शिष्टाचार शब्द वापरावेत.
(2) हृदयाच्या अभिव्यक्ती पत्रात दिसल्या पाहिजेत.
(3) पत्राची भाषा सुलभ आणि सुस्पष्ट असावी.
(4) निरुपयोगी गोष्टी पत्रात लिहू नयेत, फक्त मुख्य विषयावरच गोष्टी लिहिल्या जातात.
(5) पत्रामधील हेतू स्पष्ट करण्यासाठी छोट्या शब्दांचा वापर करावा.
(6) पत्र लिहिल्यानंतर पुन्हा ते वाचले पाहिजे.
(7) पत्र प्राप्तकर्त्याचे वय, नाते आणि योग्यता लक्षात घेऊन भाषेचा वापर केला पाहिजे.
(8) अनावश्यक विस्तार नेहमीच टाळावा.
(9) पत्रात लिहिलेला लेख स्वच्छ व स्वच्छ असावा.
(10) प्रेषक आणि प्राप्तकर्त्याचा पत्ता स्पष्टपणे लिहिला जावा.
पत्र मुख्यतः दोन प्रकारचे आहेत-
1. Marathi Formal letter
2. Marathi Informal letter
Marathi letter writing formal
औपचारिक पत्र -सरकारी कार्यालये, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार इत्यादींसाठी लिहून ठेवलेले असे पत्र औपचारिक पत्रांच्या श्रेणीमध्ये येतात.
Marathi letter writing informal
अनौपचारिक पत्र - जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित, इत्यादींसाठी लिहिलेले असे पत्र अनौपचारिक पत्रअसे म्हणतात. यांना वैयक्तिक पत्र असेही म्हटले जाते.
औपचारिक पत्राचा मायना कसा लिहावा? –
How to Write a Letter- पत्र कसे लिहावे
How to Write letter in marathi
Start Marathi Formal Letter Writing?
पत्र लिहीताना नेहमी वरील उजव्या कोप-यात (प्रेषक)आपले संपूर्ण नाव ,पत्त्ता, पिन कोड इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक लिहाव्यात.
नंतर डाव्या बाजूस(प्रति) ज्याला पत्र लिहावयाचे आहे त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, पिन कोड इत्यादी गोष्टी लिहाव्यात.
त्याखाली एक ओळ सोडून बरोबर मध्यभागी पत्राचा विषय लिहावा.
संबोधन लिहीताना माननीय(आदरणीय) महोदय या बाबींचा उल्लेख करावा.
नंतर व्यवस्थितरित्या दोन बोटांचे अंतर घेऊन मजकूर लिहीण्यास सुरुवात करावी.
औपचारिक पत्र लिहीताना भाषा व्यावसायिक असावी.
मजकूर लिहीताना नीटनेटके हस्ताक्षर आणि पत्र्याचा शेवटचा मजकूर लिहीताना परिच्छेद पाडण्यास विसरु नये.
धन्यवाद लिहून मगचं त्याखाली निवेदन लिहावे.
पत्राच्या शेवटी निवेदन लिहीताना ‘आपली/आपला विश्वासू’ असे करावे.
औपचारिक पत्र्याची सांगता प्रति (ज्याला लिहावयाचे आहे तो ) वरच्या उजव्या बाजूस आणि प्रेषक (जो लिहीणारा आहे तो) खाली डाव्या बाजूस त्या दोन्ही व्यक्तींचा नाव, पत्ता,पिन कोड प्रति च्या बाजूस लहान चौरसात तिकीट असे लिहावे.
अनौपचारिक पत्राचा मायना कसा लिहावा?
How to write Marathi Informal Letter ?
पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोप-यात पत्रलेखकाचे नाव्, पत्ता,पिन कोड, दिनांक इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक लिहाव्यात.
संबंध लिहीताना आपण पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीतोय हे लक्षात घेऊन मगच लिहावे.
उदा: बहिण,भाऊ, मित्र,मैत्रिण यांना लिहीताना प्रिय —-, आई-बाबा अथवा वयाने मोठ्या असणार्या व्यक्तींना पूजनीय /आदरणीय —–
कौंटुबिक पत्र लिहीताना न विसरता संबंधांनंतर बरोबर खालच्या ओळीत अभिवादन लिहावे.
उदा: लहान वयाच्या व्यक्तीला लिहीताना खुप खुप प्रेम, शतायुषी हो ! , सप्रेम नमस्कार, वयाने मोठ्या असणार्या व्यक्तीला लिहीताना सा.न.वि.वि ( साष्टांग नमस्कार विनंती विशेष)
कौंटुबिक पत्र लिहीताना भाषा भावनिक तसेच सरळ साधी असावी.
मजकूर लिहीताना नीटनेटकेपणा , अंतर, परिच्छेद या सर्व बाबी लक्षात ठेवाव्यात.
कळावे ! लिहून मगचं त्याखाली निवेदन लिहावे.
पत्राच्या शेवटी निवेदन लिहीताना ‘तुझी/तुझा मित्र/मैत्रिण’ वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींसाठी ‘आपला /आपली आज्ञाधारक’ असे लिहावे.
चांगला पत्र लिहिण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
प्रभावी लेखन: आपला पत्र प्रभावी टाकणार असला पाहिजे
सोपी भाषा शैलीः वाचक समजू शकेल अशी सोपी भाषा वापरा.
Marathi letter writing- important things to consider
चांगला पत्र लिहिण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
प्रभावी लेखन: आपला पत्र प्रभावी टाकणार असला पाहिजे
सोपी भाषा शैलीः वाचक समजू शकेल अशी सोपी भाषा वापरा.
थोडक्यात: पत्र नेहमी थोडक्यात लिहावे, अनावश्यक उघड करू नका.
क्रमिकरण: विषयानुसार पत्र क्रमवारीत लिहा.
शब्दलेखन सुधारणाः मात्रा आणि विरामचिन्हे यांच्यात चुका करू नका.
Marathi letter writing marathi informal letter format
1. नमुना पत्र - घरगुती पत्र पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मामाला विनंतीपत्र लिहा
दिनांक- १५ जानेवारी २०२०
प्रति,
प्रिय काका,
चिरायू सदन ,
१०२,विकास नगर,
डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे, ४९० ००४
तीर्थरूप मामास,
सा. न. वि. वि.
काही दिवसांपूर्वी मामा तुझे पत्र मिळाले, त्यातून तू दिलेल्या गोड शुभेचाही मिळाल्या. २२ फेब्रुवारी पासून माझी परीक्षा सुरु होत आहे. माझ्या अभ्यासाची तयारी हि चांगली झाली आहे.
मी मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे पण १२ वी झाल्यानंतर पुढे काय करावे याचा निर्णय मी अजून घेतलेला नाही.
आई बाबा म्हणतात "तुला जे आवडते ते निवडण्याची तुला मुभा आहे परंतु तो निर्णय तू व्यवस्तीत विचार करून घे." मामा, याबाबतचा निर्णय मी तुझ्याशी चर्च्या करूनच घ्यावा असे मला वाटत आहे, म्हणून माझी परीक्षा संपल्यानंतर मी तुझ्याकडे येऊ का?
मार्च च्या पहिल्या आठवड्यात माझी परीक्षा संपेल, नंतर मी तुझ्याकडे येण्याचा विचार केला आहे.
मार्च च्या पहिल्या आठवड्यात माझी परीक्षा संपेल, नंतर मी तुझ्याकडे येण्याचा विचार केला आहे.
त्याच काळात तुझा काही खास कार्यक्रम नाही ना? तुझ्या ऑफिस च्या कामासाठी तू कोठे बाहेर जाणार नाहीस ना?
मामा, माझ्या मित्रांशी चर्च्या केली असता ते इंजिनीरिंग व डॉक्टर अभ्यासक्रम निवडू इच्छित आहेत.
मामा, माझ्या मित्रांशी चर्च्या केली असता ते इंजिनीरिंग व डॉक्टर अभ्यासक्रम निवडू इच्छित आहेत.
पण आमची आर्थिक परिस्तिथी लक्ष्यात घेता होणारा आर्थिक भार मला माझ्या बाबांवर टाकायचा नाही आणि मला त्यात आवड सुद्धा नाही. मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे.
त्या दृष्टीने एकादा व्यवसाय किंवा नोकरीची हमी देणारा कोर्स तुझ्या माहितीत आहे का? त्यामुळे याबाबत तू विचार करून ठेव. मी आल्यावर आपण याबाबत विचार करू.
आजीला आणि मामींना साष्टांग नमस्कार. छोट्या श्रेयस ला अनेक आशीर्वाद.
आपला आज्ञाधारक,
अबक
२३२, गांधी नगर,
मुंबई
आजीला आणि मामींना साष्टांग नमस्कार. छोट्या श्रेयस ला अनेक आशीर्वाद.
आपला आज्ञाधारक,
अबक
2. Marathi letter writing- formal letter to friend 2. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र
२३२, गांधी नगर,
मुंबई
प्रिय मित्र रमेश
सप्रेम नमस्कार,
अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला.
लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा
आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय.
आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय.
तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
कळावे,
तुझाच मित्र
16 एप्रिल 2020
प्रिय मित्र यश
सप्रेम नमस्कार
आजच तुझे पत्र मिळाले. तू शालेय परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला हे ऐकुन खूप आनंद झाला.
कळावे,
तुझाच मित्र
3. Marathi letter writing to friend ३. तुमच्या मित्राने शालेय परीक्षेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र
इंदोर16 एप्रिल 2020
प्रिय मित्र यश
सप्रेम नमस्कार
आजच तुझे पत्र मिळाले. तू शालेय परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला हे ऐकुन खूप आनंद झाला.
तुझ्या या यशावर मी तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मला पूर्ण विश्वास आहे की तुझे भविष्य खूप उज्वल राहील आणि येणाऱ्या काळात तू आणखी प्रगती करशील.
तुझ्या आई वडिलांना माझा प्रणाम व लहान भावाला माझे प्रेम.
तुझा मित्र
मोहित पाटील
तुझा मित्र
मोहित पाटील
4. Marathi letter writing to congratulate friend
४. तुमच्या मित्राने इयता 12 वी च्या परीक्षेत 95% गुण मिळवले त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र
आर. जेड. एच. - 000 रजनगर 2
नवी दिल्ली- 110077
दिनांक- .....
प्रिय मित्र प्रभाकर
माझी तब्येत चांगली आहे व तुझ्या चांगल्या स्वास्थ्या साठी मी कायम प्रार्थना करीत असतो.
आर. जेड. एच. - 000 रजनगर 2
नवी दिल्ली- 110077
दिनांक- .....
प्रिय मित्र प्रभाकर
माझी तब्येत चांगली आहे व तुझ्या चांगल्या स्वास्थ्या साठी मी कायम प्रार्थना करीत असतो.
मला हे ऐकुन खूप आनंद झाला की तु इयता 12 वी च्या परीक्षेत 95% गुण मिळवले. हे यश संपादन करण्यासाठी तु खरोखर खूप मेहनत केली आहे आणि या यशाच्या लायक आहेस.
मला अभिमान वाटतो की तु माझा प्रिय मित्र आहेस. परीक्षेमध्ये तुझ्या या यशाबद्दल मी तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
आता तुझ्याकडे एक उज्वल भविष्य आहे. तू तुझ्या आवडीचे करिअर निवडू शकतो. मला आशा आहे की तुला शिक्षणासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती अवश्य मिळेल.
आता तुझ्याकडे एक उज्वल भविष्य आहे. तू तुझ्या आवडीचे करिअर निवडू शकतो. मला आशा आहे की तुला शिक्षणासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती अवश्य मिळेल.
तु जेव्हा गावी परत येशील तेव्हा आपण सर्वजण तुझ्या यशाचा आनंद साजरा करू. माझ्या शुभेच्छा सदैव तुझा सोबत आहे.
तुझा मित्र
तुझा मित्र
5. Marathi letter writing - बहिणीचे भावाला पत्र बहिणेचे भावाला अभिनंदनपर पत्र
गीता
सातारा,
१० . १० .२०२०
चि. योगेश यास,
शुभाशीर्वाद
अभिनंदन ! कालच बाबाने फोनवरून तुझा ' आदर्श विद्यार्थी ' म्हणून शाळेमध्ये सत्कार झाल्याचे सांगितले. ऐकून खूप आनंद झाला. शाब्बास! योगेश .
इयत्ता ८ वी आणि आता इयत्ता ९ वी या दोन्ही वर्षी सलग तुला हा पुरस्कार मिळतो आहे.
तरी इयत्ता १० वी मध्ये सुद्धा हा पुरस्कार मिळवून हॅट्ट्रिक करशील, असा माझ ठाम विश्वास आहे.
शाळेतील शिक्षक व इतर विद्यार्थी कडून तुझी खूप वाह वाह होत आहे. शिक्षक तर मला फोन करून तुझी प्रसंसा करतात.
शाळेतील शिक्षक व इतर विद्यार्थी कडून तुझी खूप वाह वाह होत आहे. शिक्षक तर मला फोन करून तुझी प्रसंसा करतात.
आंतरशालेय निबंध स्पर्धा, नाटक स्पर्धा तुझ्या शिवाय अपुरी आहे. समूहगीत, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा सगळ्याच बाबतीत तू नेहमी अग्रेसर असतोस.
आई ने सांगितलं एकही दिवस गैरहजर नसल्याने तुझ्या मुख्याध्याकांकडून कौतुक झालं आहे.
असो ' आदर्श विद्यार्थी ' म्हणून जसा तुझा गौरव झाला त्याचप्रमाणे समाजातही आदर्श नागरिक म्हणून तुझा सन्मान व्हावा , अशी इच्छा आहे.
पुन्हा एकदा तुझे अभिनंदन ! आई बाबांना माझा नमस्कार सांग. सुट्टी घेऊन नक्की तुला भेटायला येऊ
तुझी ताई
असो ' आदर्श विद्यार्थी ' म्हणून जसा तुझा गौरव झाला त्याचप्रमाणे समाजातही आदर्श नागरिक म्हणून तुझा सन्मान व्हावा , अशी इच्छा आहे.
पुन्हा एकदा तुझे अभिनंदन ! आई बाबांना माझा नमस्कार सांग. सुट्टी घेऊन नक्की तुला भेटायला येऊ
तुझी ताई
6.मित्राला, मैत्रिणीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पत्र - Happy Birthday Marathi letter writing to a friend in Marathi
दिनांक:१.११.२०२०.
अमृता दाते ,
मधुकर पेठ ,
जालना – ५०१३०२.
प्रिय अमृता ,
सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! यावर्षी तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी तेथे नाही आहे
खरतर या गोष्टीचे मला खूप वाईट वाटत आहे. पण मी तुझ्यासोबत नसले तरी माझे आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहेत. वाढदिवस मस्त साजरा कर.
दरवर्षी आपण तुझ्या वाढदिवसाला अनाथआश्रमाला भेट देतो आणि तो दिवस अगदी अर्थपूर्ण आणि अतिशय आनंदात जातो. यावर्षीही मी तुला तुझ्या आवडत्या भेट्वस्तूसोबत काही भेटवस्तू अनाथआश्रमातील आपल्या छोट्या दोस्तांसाठी पाठविल्या आहेत.
आठवणीने घेऊन जा.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
चल तर मग वाढदिवस झाल्यानंतर मला पत्र पाठवायला विसरू नकोस. मी वाट पाहीन.
तुम्ही सर्व कसे आहेत? आपली मिनू कशी आहे ? तुही तुझी काळजी घे.
तुम्ही सर्व कसे आहेत? आपली मिनू कशी आहे ? तुही तुझी काळजी घे.
मी दिलेली भेटवस्तू कशी वाटली ?आणि मला तू तुझ्या वाढदिवसाला केलेली मज्जा मस्ती पत्राद्वारे कळव .
पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा राहील !
तुझी प्रिय मैत्रिण,
पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा राहील !
तुझी प्रिय मैत्रिण,
7. Marathi letter writing to mother
शाळेत साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्यदिनाची हकिकत आईला पत्र लिहून कळवा -
यज्ञेश राजेश कोलते
बाल शिवाजी विद्यालय,
राउत वाडी, उत्सव कार्यालय,
जिल्हा - अकोला
दि. २-२-२०१५
प्रिय आईस,
शिरसाष्टांग नमस्कार,
तुझे पत्र मिळाले. आता मी या शाळेत चांगलाच रुळलो आहे. मला आता ही शाळा खूप आवडू लागली आहे.
नुकताच पंधरा ऑगस्टला शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा झाला. गेल्याच आठवड्यात स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने काही स्पर्धा झाल्या होत्या. त्यातील 'समर-गीत' गायन स्पर्धेत मी 'जिंकू किंवा मारू' हे गीत म्हटले.
मला तिसरे बक्षीस मिळाले. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
त्यांनी या स्वतंत्र देशासाठी विद्यार्थी काय करू शकतील, याचे उत्तम मार्गदर्शन केले. सामुहिक समर-गीत गायन खूप छान झाले. पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमच खूप छान झाला.
चिरंजीव रियाचा अभ्यास कसा चालला आहे?
ती. बाबांना शि.सा. नमस्कार. चि. रियाला अनेक आशीर्वाद.
तुझा,
Marathi letter writing- marathi formal letter format
1. शाळेत रजेसाठी विनंती पत्र
तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्थित राहणार आहात , त्यासाठी मुख्याध्यापकांना पत्रकुमारी राणी पाटील
गांधी चौक बुलडाणा
दि . 11 जानेवारी 2020
प्रति , माननीय मुख्याध्यापक ,
आदर्श विद्यालय ,बुलडाणा
गुरुवर्य,
सा.न.वि.वि.
मी आपल्या शाळेत 10 वी अ वर्गात शिकत आहे . दि . 18 जानेवारी 2020 रोजी माझ्या मोठ्या भावाचे लग्न आहे .
लग्न सांगली येथे आहे . या लग्नासाठी आम्ही घरांतील सर्वजण जाणार आहोत .
म्हणून मी 16 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यत शाळेत उपस्थित राहू शकणार नाही . या रजा काळातील बुडालेला माझा अभ्यास मी माझ्या मैत्रिणींच्या साहाय्याने पूर्ण करीन .
मी अभ्यासात मागे पडणार नाही अशी मी खात्री देते .
या कृपया मला रजा द्यावी , ही नम्र विनंती
तसदीबद्दल क्षमा असावी .
आपला नम्र
या कृपया मला रजा द्यावी , ही नम्र विनंती
तसदीबद्दल क्षमा असावी .
आपला नम्र
2.Marathi letter writing- letter to principal शिष्यवृत्तीसाठी प्रधानाचार्य विनंती पत्र लिहा
श्रीमान, सर,
स्टेट इंटर कॉलेज,
गोरखपुर
विषय: शिष्यवृत्तीसाठी प्रधानाचार्य पत्र.
सर,
सेवेमध्ये मी विनंती करतो की मी तुमच्या शाळेतील दहावीचा विद्यार्थी आहे. माझे वडील सरकारी कार्यालयातील शिपाई होते, पण आता ते निवृत्त झाले आहेत.
स्टेट इंटर कॉलेज,
गोरखपुर
विषय: शिष्यवृत्तीसाठी प्रधानाचार्य पत्र.
सर,
सेवेमध्ये मी विनंती करतो की मी तुमच्या शाळेतील दहावीचा विद्यार्थी आहे. माझे वडील सरकारी कार्यालयातील शिपाई होते, पण आता ते निवृत्त झाले आहेत.
आमच्याकडे पाच भाऊ आणि बहिणी आहेत, त्यामुळे घराची किंमत फारच कठीण आहे. या परिस्थितीमुळे माझे अभ्यास अशक्य झाले आहेत.
म्हणूनच तुम्हाला माझी शिष्यवृत्ती देण्यास विनंती केली जाते जेणेकरून मी माझी अभ्यास सुरू ठेवू शकेन. मी नववी वर्ग प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली आहे.
याशिवाय, मी अंडर-कॉम्पटिबल शतरंज स्पर्धेत प्रथम आलो आहे.
मला आशा आहे की शिष्यवृत्ती दिली जाईल.
तुमचा आज्ञाधारक शिष्य
हिमांशु शर्मा
मला आशा आहे की शिष्यवृत्ती दिली जाईल.
तुमचा आज्ञाधारक शिष्य
हिमांशु शर्मा
3. Marathi letter writing- request letter example- ध्वनिवर्धकांचा आवाज कमी करण्याबाबत तक्रार पत्र लिहा
प्रमोद सावंत
४२०, मोहसदन,
म
प्रति,
मा. व्यवस्थापक,
समस्त गणेश उत्सव समिती
स न वि वि
विषय :- ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करण्याबाबत
महोदय,
मी आपल्या परिसरात राहणार, इयत्ता १२ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. लवकरच गणेशोत्सव साजरा होणार आहे.
प्रमोद सावंत
४२०, मोहसदन,
म
प्रति,
मा. व्यवस्थापक,
समस्त गणेश उत्सव समिती
स न वि वि
विषय :- ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करण्याबाबत
महोदय,
मी आपल्या परिसरात राहणार, इयत्ता १२ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. लवकरच गणेशोत्सव साजरा होणार आहे.
सालाबाद प्रमाणे आपण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतो.सामाजिक बांधिलकी साठी असे उत्सव साजरे झालेच पाहिजे त.
या निमित्ताने युवाशक्ती एकत्र येऊन अनेक लोकोपयोगी कामे करते. त्यामुळेच मी ही या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो पण जेव्हा असे उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे होतात तेव्हा समाजातील सर्व घटकांना त्रास न होता समाधान, आनंद, कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अशा कार्यक्रमामध्ये ध्वनिवर्ध काचा वापर अटळ आहे; पण त्याचा त्रास आजारी, वृद्ध आणि विद्यार्थी यांना होणार नाही.हे सामाजिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.
माझ्यासाठी तर हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे. नेमकं गणेशोत्सवाच्या काळात आमची परीक्षा सुरू होत आहे. ध्वनिवर्धक च्या आवाजाने अभ्यासात लक्ष लागणे कठीण आहे,
तरी आपणास नम्र विनंती आहे की, ध्वनिवर्धक आवाज मर्यादित ठेवून मला सहकार्य करावे.
आपण माझ्या विनंतीचा नक्की विचार कराल अशी आशा बाळगतो.
आपला कृपभिलाषी
4. Marathi letter writing- पुस्तके पाठवण्याची विंनती पत्र
पुस्तके पाठवण्याची विंनती करणारे पत्र लिहा
प्रति,
मेहता बुक पुब्लिशर्स,
पुणे - ४११०३०
विषय :- पुस्तके पाठवण्याची विंनती
महोदय,
कृपया खालील पुस्तकांची दोन-दोन प्रती खाली दिलेल्या माझ्या पत्यावर पाठवण्याची कृपा करावी .
१.आंधळ्या बाईचे वंशज
२.डोंगरा एवढा
३.आनंदाचा पासबुक
४.घरभिंती
५.मॅग्नोलिया
आपला विश्वासू
पुस्तके पाठवण्याची विंनती करणारे पत्र लिहा
प्रति,
मेहता बुक पुब्लिशर्स,
पुणे - ४११०३०
विषय :- पुस्तके पाठवण्याची विंनती
महोदय,
कृपया खालील पुस्तकांची दोन-दोन प्रती खाली दिलेल्या माझ्या पत्यावर पाठवण्याची कृपा करावी .
१.आंधळ्या बाईचे वंशज
२.डोंगरा एवढा
३.आनंदाचा पासबुक
४.घरभिंती
५.मॅग्नोलिया
आपला विश्वासू
5. Marathi letter writing -बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र
बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी शाळेला विनंति पत्रप्रति,
माननीय मुख्याध्यापक,
अ ब क शाळा / कॉलेज,
आ ब रोड,
पिनकोड
विषय :- बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्याबाबत
महोदय,
मी विनंती करतो की मी आपल्या शाळेच्या ........ कक्षातील विद्यार्थी आहे. मला बँकेमध्ये बचत खाते उघडण्याची गरज आहे,
माननीय मुख्याध्यापक,
अ ब क शाळा / कॉलेज,
आ ब रोड,
पिनकोड
विषय :- बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्याबाबत
महोदय,
मी विनंती करतो की मी आपल्या शाळेच्या ........ कक्षातील विद्यार्थी आहे. मला बँकेमध्ये बचत खाते उघडण्याची गरज आहे,
त्यासाठी मला वास्तविक प्रमाणपत्र आवश्यक आहे. कारण माझ्याकडे अद्याप प्रमाणपत्र नाही.म्हणून मला वास्तविक प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी. कळावे!
धन्यवाद !
आपला विश्वासू विद्यार्थी
6. Marathi letter writing - job application letter
दिनांक- १ जानेवारी २०२०
प्रति,
माननीय प्राचार्य,
XYZ विद्यालय ,
१०२,विकास नगर,
डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे, ४९० ००४
विषय: लिपिकाच्या पदासाठी अर्ज.
महोदय,
आपल्या महाविद्यालयात लिपिकाचे पद भरायचे असल्याबाबतची जाहिरात आज दिनांक १ जानेवारी २०२० च्या दैनिक सकाळ च्या अंकात वाचली.
धन्यवाद !
आपला विश्वासू विद्यार्थी
6. Marathi letter writing - job application letter
नमुना पत्र - लिपिकाच्या पदासाठी अर्ज
दिनांक- १ जानेवारी २०२०
प्रति,
माननीय प्राचार्य,
XYZ विद्यालय ,
१०२,विकास नगर,
डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे, ४९० ००४
विषय: लिपिकाच्या पदासाठी अर्ज.
महोदय,
आपल्या महाविद्यालयात लिपिकाचे पद भरायचे असल्याबाबतची जाहिरात आज दिनांक १ जानेवारी २०२० च्या दैनिक सकाळ च्या अंकात वाचली.
मी हा सादर अर्ज करत असून मी या पदासाठी इच्छुक आहे.
मी ABC पदवीधर असून २०१८ साली इतिहास व अर्थशास्त्र या भाषांतील पदवी परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो आहे.
मी ABC पदवीधर असून २०१८ साली इतिहास व अर्थशास्त्र या भाषांतील पदवी परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो आहे.
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच मी इंग्रजी आणि मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झालो आहे.
माझी इंग्रजी टायपिंग ची गती ६५ शब्द प्रति मिनिट आहे तसेच मराठी टायपिंग हि सहजतेने करू शकतो.
मी ______ महाविद्यालयात मागील दोन वर्षांपासून टंकलेखकाचे काम करत आहे. मी आपल्या महाविद्यालयातीळ काम समाधानकारकरित्या पार पाडीन याची मला खात्री आहे.
माझ्या परीक्ष्यांची गुणकपत्रे आणि प्रमाणपत्रे तसेच शिफारस पत्र व माझ्या वर्तवणुकीचा दाखल यांच्या सत्य प्रति सोबत जोडल्या आहेत.
माझ्या अर्जाचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून मला मुलाखतीची संधी द्यावी हि नम्र विनंती.
आपला विश्वासू
मी ______ महाविद्यालयात मागील दोन वर्षांपासून टंकलेखकाचे काम करत आहे. मी आपल्या महाविद्यालयातीळ काम समाधानकारकरित्या पार पाडीन याची मला खात्री आहे.
माझ्या परीक्ष्यांची गुणकपत्रे आणि प्रमाणपत्रे तसेच शिफारस पत्र व माझ्या वर्तवणुकीचा दाखल यांच्या सत्य प्रति सोबत जोडल्या आहेत.
माझ्या अर्जाचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून मला मुलाखतीची संधी द्यावी हि नम्र विनंती.
आपला विश्वासू
7.Marathi letter writing example
प्रती
माननीय आयुक्त
पुणे महानगरपालिका,
रस्ते बांधणी विभाग,
पुणे- ४११ ००१
विषय: रस्ता दुरुस्ती संबंधी मागणी पत्र
सन्माननीय महाशय
मी अजय जाधव, महर्षि कर्वे रस्त्यावरील 'स्वर्णनगरी' इमारतीती राहतो. सध्या या रस्त्यावरील वाहतूक अति वाढली आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी पत्र | Rasta durusti patra lekhan
प्रती
माननीय आयुक्त
पुणे महानगरपालिका,
रस्ते बांधणी विभाग,
पुणे- ४११ ००१
विषय: रस्ता दुरुस्ती संबंधी मागणी पत्र
सन्माननीय महाशय
मी अजय जाधव, महर्षि कर्वे रस्त्यावरील 'स्वर्णनगरी' इमारतीती राहतो. सध्या या रस्त्यावरील वाहतूक अति वाढली आहे.
त्यात ट्रक तसेच मोठमोठया बसेस यांचाही समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण रास्ता अतिशय खराब झाला आहे.
त्यामुळे रिक्शा, लहान वाहने, दुचाकी वाहने, यांचे येथे बरेच लहान मोठे अपघात होत असतात.
या रस्त्याच्या कडेला असलेला पादचारी मार्गही मुळातच अरुंद आहे. त्यावरील फरश्याही उखडलेल्या आहेत.
या रस्त्याच्या कडेला असलेला पादचारी मार्गही मुळातच अरुंद आहे. त्यावरील फरश्याही उखडलेल्या आहेत.
त्यामुळे पादचाऱ्यांना तेथून चालनेही कष्टदायक होते. त्यातच भर म्हणजे फेरीवाले, भाजीवाले यांनी त्या मार्गावर मुक्काम ठोकलेला असतो.
शिवाय आता पाऊस अगदी तोंडावर आला आहे. अशा रस्त्यामुळे वाहनांची वाहतूक करणे अवघड जाईल व सर्वांना त्रास होईल.
शिवाय आता पाऊस अगदी तोंडावर आला आहे. अशा रस्त्यामुळे वाहनांची वाहतूक करणे अवघड जाईल व सर्वांना त्रास होईल.
तेव्हा आपण कृपया जातीने त्या कामाकडे लक्ष द्यावे आणि पाऊस सुरू होण्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी विनंती आहे.
आपण हे काम पूर्ण करून जनतेचा दुवा घ्यावा हीच मनीषा.
आपला कृपाभिलाषी
आपला कृपाभिलाषी
8. Marathi letter writing- request for ATM pin
प्रति,
माननीय बँक मॅनेजर (व्यवस्थापक)
बँक ऑफ महाराष्ट्र ,
कासेगाव,
सावंतवाडी- ४००५०२.
विषय : नवीन ए.टी.एम पिन मिळण्याबाबत.
माननीय महोदय,
मी अर्जुन सावंत आपल्या बँकेत माझे बचत खाते आहे. माझा खाते क्रमांक १२५४४००००६७५ हा आहे.
प्रति,
माननीय बँक मॅनेजर (व्यवस्थापक)
बँक ऑफ महाराष्ट्र ,
कासेगाव,
सावंतवाडी- ४००५०२.
विषय : नवीन ए.टी.एम पिन मिळण्याबाबत.
माननीय महोदय,
मी अर्जुन सावंत आपल्या बँकेत माझे बचत खाते आहे. माझा खाते क्रमांक १२५४४००००६७५ हा आहे.
मी माझा ए.टी.एम पिन क्रमांक विसरलो आहे.त्यामुळे मला ए.टी.एम मधून व्यवहार करणे शक्य होत नाही आहे.
कृपया, तुम्ही मला पोस्टाद्वारे मी खाली पुरविलेल्या पत्त्यावर नवीन ए.टी.एम पिन क्रमांक पाठवावा.
जेणेकरून मी पुन्हा व्यवहार करू शकेन. या वेळी मी पुन्हा ए.टी,एम पिन क्रमांक विसरणार नाही याची दक्षता घेईन.
कळावे !
आपला नम्र ,
कळावे !
आपला नम्र ,
आशा आहे तुम्हाला Marathi letter writing ही पोस्ट आवडली असेल, तुम्हाला आणखी कोणत्याही पत्राचे नमुने अथवा आरेखन(marathi letter writing format with examples) हवे असतील
तर कमेंट करा आम्ही ह्या पोस्ट मध्ये त्यांचा नक्की समावेश करू. आशा प्रकारे मराठी पत्रलेखन केले जाते. हा फॉरमॅट (marathi letter writing format)वापरून तुम्ही अनेक प्रकारची पत्रे लिहू शकता.