Paani Marathi Cinema Full Review In Marathi- पाणी सिनेमा फुल रिव्ह्यू

 मास्टरपीस बनता बनता राहिला आदिनाथ कोठारेचा पाणी सिनेमा

Pani review in marathi



पाणी हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. पाण्याची समस्या सोडवण्यासाठीच्या धडपडीतून प्रेमाचा जिवंत प्रवास पडद्यावर दाखवण्यात आला आहे. ह्यात आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत असून त्यानेच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. प्रियांका चोप्रा आणी महेश कोठारे यांनी ह्या चित्रपटाची  निर्मिती केली आहे. चला तर पाहूया ह्या सिनेमाचा संपूर्ण रिव्ह्यू.
कथा
कथेच्या बाबबीत बोलायचे तर  एका बाजूला नायकाचे प्रेम आहे तर दुसरीकडे एक कठोर सामाजिक वास्तव आहे. सत्य घटना दाखवताना कथा एकाच ठिकाणी रेंगाळत राहते आणि फारसे काही घडतच नाहीये असे वाटायला लागते. मात्र इंटर्व्हल नंतर कथा वेग पकडते. चित्रपटाचा शेवट उत्तम झाला आहे
गोष्ट एक निखळ प्रेमकथेवर आधारित आहे. पाण्याची टंचाई असलेल्या, घरातील स्त्रियांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागते या विषयाला धरून आहे. हनुमंत म्हणजे आदिनाथ कोठारेचे लग्न दुसऱ्या गावातील सुर्वणाशी म्हणजे ऋचा वैदय हिच्याशी ठरतं.  पाण्याच्या समस्येमुळे तिच्या घरचे लग्न मोडतात. पण ह्या काळात त्याचे सुवर्णावर प्रेम बसते आणि तिला सुद्धा तो आवडत असतो. त्यामुळे आपल्या प्रेमाच्या आड आलेल्या पाण्याच्या समस्येवर उपाय काढायला लागतो.  ‘पहिल्यांदा गावात पाणी आणणार आणि मग लग्न करणार!’ अशी प्रतिज्ञाच तो करतो. अशी कथा आहे
दिग्दर्शक
दिग्दर्शक म्हणून आदिनाथ कोठारेचा पहिला चित्रपट आहे त्याने ही जबाबदारी चांगली पेलली आहे. पाणी समस्या दाखवताना काही दृश्ये मनाचा ठाव घेतात मात्र हनुमंतचा संघर्ष आणि स्थानिक राजकारण यात संतुलन राखण्यात दिग्दर्शक कमी पडतो. राजकारण आणि प्रेम ह्या जुगलबंदीमध्ये कथा रेंगाळत राहते.
अभिनय
आदिनाथ कोठारे उत्तम अभिनेता आहे  सहज अभिनय ही सिनेमाची जमेची बाजू आहे. हनुमंतचा संघर्ष, जिद्द आणि प्रेम ह्यात हनुमंताची होणारी घालमेल आदिनाथने सुंदर रित्या दाखवली आहे.  ऋचाला अभिनयासाठी फारसा वाव मिळालेला नाही. तिच्या पात्राला आणखी सीन्स द्यायला पाहिजे होते असे वाटत राहते. सुबोध भावेनं त्याची छोटी व्यक्तिरेखा सहजतेनं साकारली आहे. गावकऱ्यांचं आणि इतर छोट्या-छोट्या पात्रांचं कास्टिंग अचूक झालं आहे
संगीत
गुलराज सिंग यांचे संगीत ठीक ठाकच आहे. पडद्यावर दिसणाऱ्या प्रसंगानुरूप अधिक हृदयाला भिडणाऱ्या संगीताची अपेक्षा होती. नग थांबू रे- हे गाणे उत्तम जमलंय.
सिनेमॅटोग्राफी-
सूर्यप्रकाशाच्या वेगवेगळ्या छटा आणि रखरखीत जमिनीचं दर्शन चित्रपटात सुंदर रीतीने दाखवलं आहे दाखवणारी काही दृश्य पाहून मन हेलावते. अर्जुन सोर्ते यांनी हे चित्रण मस्त जमवले आहे. काही काही दृश्यात नागराज मंजुळेची आठवण येते.
फसलेल्या गोष्टी
सिनेमा थोडा फास्ट हवा होता. प्रेम आणि वास्तव यात गुंफणारी वेगवान कथा असती तर अधिक परिणामकारक वाटले असते. संगीत थोडे उत्कट असायला हवे. बाकी सिनेमा उत्तम जमून आला आहे. प्रेमाची ही अनोखी गोष्ट तुम्ही थीएटर मध्ये जाऊन नक्की पाहू शकता.
ह्या सिनेमासोबतच आणखी एक मराठी सिनेमा थिएटर मध्ये दाखल झाला आहे तो म्हणजे अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा लाईक आणी sabscribe. ह्या सिनेमाचा सुद्धा  रिव्ह्यू आम्ही टाकला आहे तो ही तुम्ही पाहू शकता.









टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने