मर्डर मिस्ट्रीचे फॅन असाल तर बघून घ्या like आणि subscribe.
अमेय वाघ,अमृता खानविलकर,शुभंकर तावडे,जुई भागवत,पु्ष्कराज चिरपूटकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला लाइक आणि सबस्क्राइब’ सिनेमा रिलीज झाला आहे. मर्डर मिस्ट्री असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो की नाही ते आज आम्ही तुम्हाला सांगणारं आहे.
कथा आणि पटकथा
सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात कथा फार महत्वाची असते. कथेच्या बाबतीत बोलायचे तर कथेतील रहस्य सुरवातीपासून शेवटपर्यंत राखण्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटभर चांगला रहस्यमयी चित्रपट पाहण्याचा फील येतो. कथानकातील रहस्याचे पुरावे मध्ये मध्ये खुबीने पेरले आहेत. साधी सरळ पण वाकडी अशी कथा अत्यंत सुंदर पद्धतीने दाखविली आहे.
सिनेमाच्या प्रोमो आणि टीजरमध्ये दाखवल्याप्रमाणे खुशी एक व्लॉगर आहे. अभिनेत्री बनण्यासाठी आलेली खुशी तिची मैत्रीण श्रुतीसोबत भाड्यानं मुंबईत राहत असते. एके दिवशी लाइव्ह व्लॉगिंग करताना अनपेक्षितपणे तिच्या व्हिडीओमध्ये एक मृतदेह दिसतो. या घटनेनंतर ती या ‘मर्डर मिस्ट्री’मध्ये अडकली जाते. अशी साधारण कथा आहे.
सिनेमाची पटकथाही चांगल्या पद्धतीने गुंफली आहे. मध्ये मध्ये अनेक पात्र येतात आणि कथा पुढे सरकत राहते. वातावरणनिर्मिती आणि गूढता तयार तयार करता करताइंटर्व्हल होतो. दीपिका म्हणजे अमृता खानविलकर ही एक एनजीओ चालवत असते. ती या खुनाच्या प्रकरणातून खुशीला वाचवण्यासाठी दीपिका तिच्यासोबत उभी राहते.
रवी म्हणजे शुभंकर तावडे आणि रोहिदास म्हणजे अमेय वाघ हे या सिनेमाची गूढता वाढवतात. कोणाचा खून होतो? का होतो? खुनी कोण? या सगळ्याची उत्तरं शोधायला तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.
दिग्दर्शन
या सिनेमाचा लेखक आहे तोच दिग्दर्शक आहे दोन्ही जबाबदाऱ्या अभिषेक मेरूकर यांनी लीलया सांभाळल्या आहेत. खिळवून ठेवणारी गोष्ट लेखक-दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांनी ‘लाइक आणि सबस्क्राइब’ या सिनेमात दाखवली आहे. दिग्दर्शनाचा त्यांचा हा पहिला प्रयत्न असूनही त्यांनी अप्रतिम काम केले आहे.
अभिनय
प्रमुख भूमिकेतअमेय वाघ यानं रोहिदास हे पात्र सहजतेनं रंगवले आहे. अमृता खानविलकरनं दीपिका या पात्राला योग्य दिला आहे. जुई भागवतचा पहिला चित्रपट असूनही ती कुठेही नवखी वाटत नाही. रवी म्हणून शुभंकर तावडे भाव खाऊन गेला आहे
संगीत
अमितराज यांनी चित्रपटाला दिलेले संगीत ठीक ठाक आहे. गौतमी पटीलचे एक आयटम सॉंग आहे मात्र तेही मनाची पकड घेत नाही.
फसलेल्या गोष्टी
कथा खूप लांबवली गेल्या सारखी वाटते. अजून 15 वीस मिनिटे सिनेमाची लांबी करून कथा वेगवान करता आली असती. आणि ट्विस्ट प्रेडिक्टेबल वाटतात; त्यामुळे काही ठिकाणी सिनेमा थरारक वाटत नाही.
मर्डर मिस्ट्री मध्ये पोलिस तपासाची बाजू महत्वाची असते मात्र इथेच कथेने कच खाल्ली आहे. वरवरचा पोलीस तपासामुळे सिनेमा काही अंशी अधुरा वाटतो.
बाकी मर्डर मिस्ट्रीचे फॅन असाल किंवा थरारपत पाहायचा असेल तर हा सिनेमा नक्की पाहू शकता. आज ह्या चित्रपटसोबत आणखी एक मराठी मुवि पाणी हा रिलीज झाला आहे. त्याचाही रिव्ह्यू तुम्ही आमच्या चॅनेल वर पाहू शकता.

Tags:
मनोरंजन