Phullwanti Movie collection | movie hit or flop? फुलवंती सिनेमाची कमाई

फुलवंती सिनेमाची एकूण कमाई- Phullwanti Movie Is Hit Or Flop

Day wise collection of phullwanti movie 

Phullwanti movie collection


अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता हा चित्रपट हिट ठरला की फ्लॉप हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. तेच आता तुम्हाला सांगणार आहे.

फुलवंती’  म्हणजे पेशवाईतील एका नर्तिकेची कथा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर हा सिनेमा बेतलाय. एका स्वाभिमानि नर्तिकेची गोष्ट हा सिनेमा सांगतो या चित्रपटा बद्दल बोलायचे तर

तर फुलवंती ही एक प्रसिद्ध नर्तिका असते जी संपूर्ण भारतात प्रसिद्ध असते. दिल्लीच्या बादशहानं तिला ‘चाँद-ए-मुघल’ ह्या पदवीने गौरविल असते या बदल्यात तिला फक्त दिल्ली दरबारी नृत्य करण्याचे बंधन घालण्यात येते. त्यामुळे हाडाची कलाकार असलेली फुलवंती हे मान्य करत नाही फुलवंती आपला आत्मसन्मान जपण्यासाठी सर्व सुखाचा त्याग करते.  
फुलवंती हिट कि फ्लॉप



त्याच वेळी ती पुण्यात येते तेथील एक विद्वान पंडित व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री तिच्या आयुष्यात येतात आणि तिच्या सगळ्या आयुष्याला कलाटणी मिळते अशी साधारण कथा आहे. Collection च्या बाबतीत चित्रपटाने घोर निराशा केली आहे.  कोणत्याही दिवशी कलेक्शन 1 करोडलाही पोहोचले नाही. रविवारी दिवशी सिनेमाने सर्वाधिक कमाई केली ती म्हणजे 75 लाख रुपयांची. दिवसागणिक सिनेमाची कमाई पाहूया.

फुलवंती’ मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य कलाकृती आहे. चित्रपट भव्यदिव्य असला तरी त्याच्या कमाईचे आकडे फार चांगले नाहीत.
पहिल्या दीवशी कमाई होती 0.10 लाख, दुसऱ्या दिवशी 36 लाख तिसऱ्या दिवशी रविवार होता तेव्हा कमाई वाढून 75 लाख  दिवशी सोमवारी चित्रपट आपटला या चित्रपटाने १६ लाख रुपयाचे कलेक्शन केले. तर पाचव्या दिवशी या सिनेमाने १९ लाख रुपयांचा गल्ला जमवला. सहाव्या दिवशी 18 लाख कमावले सातव्या दिवशी 19 लाख आठव्या दिवशी 16 लाख आणि नवव्या दिवशी म्हणजे रविवारी पुन्हा कमाई थोडी वाढली आणि 44 लाख झाली.

दिवसागणिक कमाई
10 लाख
36 लाख
75 लाख
16 लाख
19 लाख
18 लाख
19 लाख
16 लाख
44 लाख
13 लाख
14 लाख
13 लाख
12 लाख
13लाख
13लाख
27लाख(शनिवार)
28लाख(रविवार)
07लाख
07लाख
07लाख
13लाख
19 लाख
06लाख
06लाख
06लाख
05लाख
05लाख
05लाख
40लाख(पाचवा आठवडा)
24लाख(सहावा आठवडा)
------------

5.84करोड- एकूण कमाई(बेचाळीस दिवस)

5.84cr total net collection



6.50करोड- एकूण ग्रॉस कमाई

Phullwanti is hit or flop

म्हणजे चित्रपटाची नेट कमाई फक्त 5.84 करोड एवढी आहे.  धर्मवीर आणि नवरा माझा नवसाचा यांनी पहिल्या रविवारी जवळ जवळ 3 करोड रुपयांची कमाई केली होती. त्यांच्या मनाने ह्या चित्रपटाने घोर निराशा केली आहे.

नवरा माझा नवसाचा चित्रपट सुपरहिट ठरला असून त्याने आत्तापर्यत 21 करोड  रुपये कमावले आहेत. दुसरीकडे धर्मवीरने 17 करोड रुपयांची कमाई केली आहे. त्यांच्या तुलनेत फुलवंती फुसका बार ठरला आहे. हा सिनेमा जवळ जवळ फ्लॉप झाल्यात जमा आहे. फुलवंती टीमने budget अजून जाहीर केले नाही. मात्र सिनेमाचा आवाका पाहता budget कमीत कमी 6 करोड नक्कीच असेल.

 त्यामुळे चित्रपटाला हिट टॅग मिळविण्यासाठी अजून चांगली कमाई करावी लागेल. मात्र एकूण ट्रेंड बघता हे होणे मुश्किल आहे. बाकी फुलवंती सोबत एक नंबर हाही सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाची पार धूळधाण झाली आहे. त्याने आत्तापर्यत फक्त 1.4करोड कमावले आहेत. हा सिनेमा disaster बनला आहे.


बाकी ह्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे अजून तरी नाच ग घुमाच आहे. त्याने 25 करोड रुपये कमावले होते. या चित्रपटाचा रेकॉर्ड कोण ब्रेक ह्या वर्षी कोण ब्रेक करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ह्या वर्षी धर्मरक्षक संभाजी हा सिनेमा होऊ घातला आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. सुबोध भावे निर्मित संगीत मानापमाण सुद्धा येणार आहे. तो सिनेमाही चांगली कमाई करू शकतो.
अठराव्या दिवशी सिनेमा 10 लाखाच्या खाली आला आहे त्यामुळे दिवाळीत काही खास कमाई होणार नाही. परिणामी हा सिंनेमा hit होणार नाही. जास्तीत जास्त एव्हरेज रेटींग मिळेल.

budget- 6cr

फुलवंती box office verdict analysis 

0-1 cr = washout
1-3cr= disaster
3-5cr= flop
5-8cr= Average
8-10cr =hit
10-20cr= superhit
20-35= Blockbuster
Above 35cr= All time blockbuster

हिट की फ्लॉप- एव्हरेज
Final verict- average


रिलिझ डेट चुकल्याची चर्चा

दर्जेदार कहाणी, तगडा अभिनय, जबदस्त सेट्स, सुंदर सिनेमॅटोग्राफी, श्रवणीय गाणी, साजेशे नृत्य दिगदर्शन आणि संगीत असा परिपूर्ण चित्रपट आहे तरीही त्या मानाने चित्रपटाची कमाई कमीच म्हणावी अशी आहे. सिनेमाने चार करोड रुपये कमावले आहेत.

फुलवंती हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर चालला नाही यामागे काही कारणे आहेत त्यांच्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे सिनेमाची रिलिझ डेट चुकली. सिनेमाने दसऱ्याचा शुभ मुहूर्त पकडला होता. दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्या दिवशी कमाई होती 10 फक्त लाख रुपये.

 पहिल्या दिवशी एवढी कमी कमाई म्हणजे प्रेक्षकांमध्ये हा सिनेमा बघण्याची उत्सुकता जागृत करण्यात निर्माते कमी पडले तसेच म्हणावे लागेलं. सोशल मीडियाचा योग्य वापर करून चित्रपट व्यवस्थित प्रमोट केला नाही. ज्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सिनेमा आला तो शनिवारी आला. त्यामुळे सिनेमाला जास्त फायदा झाला नाही आणि मराठी प्रेक्षक दसऱ्याला पूजाअर्चा करण्यात व्यस्त असतात त्यामुळे ह्या सुट्टीचा फायदा झाला नाही. तसेच सिनेमाला व्यवस्थित स्क्रीन उपलब्ध करून द्यायला निर्माते कमी पडले. एकाच वेळी नवरा माझा नवसाचा, धर्मवीर, एक नंबर आणि फुलवंती थिएटर मध्ये होते. एक तर मराठी सिनेमाना स्क्रीन भेटत नाही 

 त्यामुळे मुळातच तुटपुंज्या असणाऱ्या स्क्रीनसाठी मारामार झाली. त्यामुळे सुरवातीचे जे दोन तीन दिवस चांगली कमाई करण्याचे असतात ते वाया गेले. यामुळे शनिवारी दसरा आणि दुसऱ्या दिवशी रविवार असूनही पहिल्या तीन दिवसांची कमाई होती फक्त 1 करोड तीस लाख रुपये.

ह्या सिनेमाची माऊथ publicity चांगली होती. सर्व लोकांना चित्रपट आवडला होता. मात्र दसऱ्या नंतर लगेच मुलांच्या परीक्षा सुरू झाल्या. मराठी सिनेमे लोक सहकुटुंब जास्त बघतात त्यामुळे अर्धे प्रेक्षक कमी झाले. मुलांच्या परीक्षा संपल्या की लोक दिवाळीच्या तयारीला लागणार. म्हणजे हा सिनेमा अत्यंत चुकीचा वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे.
या उलट हा सिनेमा ऐन दिवाळीत प्रदर्शित झाला असता तर चांगले झाले असते. 

दिवाळीत सिंघम आणि भुलभुलैया येत आहेत तरीही ह्या सिनेमाने चांगली कमाई केली असती. कारण यापूर्वीही अनेक मराठी चित्रपटानी दिवाळीत हिंदी चित्रपटांना टक्कर देत जबरदस्त कमाई केली होती. त्यामुळे हिंदीत मोठे सिनेमे रिलीज झाले तरी मराठी सिनेमाला व्यवस्थित कमाई करण्याची संधी असते. त्यामुळे फुलवंती जर दिवाळीत प्रदर्शित झाला असता तर कमाईचे आकडे वेगळे असले असते.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने