Top 10 Marathi Movies Of 2024| सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट

2024 मधील सर्वाधिक कमाई करणारे टॉप टेन मराठी चित्रपट


आज आम्ही तुम्हाला 2024 म्हणजे हया वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप टेन मराठी चित्रपटांची माहिती देणार आहोत. यंदा असंख्य मराठी चित्रपट रिलिझ झाले मात्र मराठी चित्रपट सृष्टीसाठी हे वर्ष फारसे लाभदायक ठरले नाही. काही मोजके चित्रपट सोडले तर बाकीच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिस वर फारशी कमाई करता आली नाही.


Top 10 marathi movies 2024

10. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर
दहा नंबर वर आहे चाळिशीतले चोर हा चित्रपट ह्या वर्षाच्या सुरुवातीला रिलिझ झालेल्या या चित्रपटांने 3 करोड रुपये कमावले. तगडी स्टारकास्ट पाहता ही कमाई कमीच म्हणावी लागेल. ह्या चित्रपटात सुबोध भावे,मुक्ता बर्वे, उमेश कामत, मधुरा वेलणकर, श्रुती मराठे, अतुल परचुरे अश्या कलाकारांची फौज होती.

9. पल्याड पल्याड
कामाईच्या बाबतीत नऊ नंबर वर आहे. अल्याड पल्याड हा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. ह्या चित्रपटाने साडेचार करोड कामावले असून यात गौरव मोरे, मकरंद देशपांडे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी हे कलाकार होते.

8. घरत गणपती
बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत आठव्या नंबर वर घरत गणपती हा सिनेमा आहे. ह्या सिनेमांस जवळ जवळ पावणे पाच करोड रुपये कमावले आहेत. गणेशोत्सवात रिलीज झालेल्या ह्या चित्रपटात भूषण प्रधान, अजिंक्य देव, अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

7.फुलवंती
2024 मध्ये कामाईच्या बाबतीत सातव्या नंबर वर नुकताच रिलिझ झालेला फुलवंती असून या चित्रपटाने तीन आठवड्यात पाच करोड रुपये कमावले आहेत. सहाव्या नंबर वर असलेल्या शिवारायांचा छावा ह्या चित्रपटाच्या कामाईपेक्षा  फुलवंतीची कमाई दीड करोड ने कमी आहे. फुलवंती सिनेमाने जर दिवाळीत चांगली कमाई केली तर सिनेमाला सहाव्या नंबर वर जाता येईल. फुलवंती चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत

6. शिवरायांचा छावा
सहाव्या नंबर वर शिवरायांचा छावा हा चित्रपट असून ह्या चित्रपटाने साडे सहा करोड रुपयांची कमाई केली आहे. यात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, भूषण पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

5.ओले आले
पाचव्या नंबर वर ओले आले हा सिनेमा असून ह्या सिनेमाने बॉक्स ऑफीस वर साडे आठ करोड कमावले आहेत. ह्या चित्रपटात नाना पाटेकर, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, मकरंद देशपांडे हे कलाकार होते.

4. जुनं फर्निचर
चौथ्या नंबर वर जुने फर्निचर हा सिनेमा असून ह्या चित्रपटाने 14 करोड रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, ओंकार भोजने, शिवाजी साटम हे कलाकार होते.

3.धर्मवीर 2
तिसऱ्या नंबर वर नुकताच रिलीज झालेला धर्मवीर 2 हा सिनेमा असुन ह्या सिनेमाने सतरा करोड रुपये कमावले आहेत. ह्यात प्रसाद ओक, क्षितिज दाते ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

2. नवरा माझा नवसाचा 2
दुसऱ्या नंबर वर नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाने चोवीस करोड रुपये कमावले आहेत. ह्या चित्रपटात सचिन पिळगावकर,सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी हे प्रमुख भमिकेत होते.

1. नाच ग घुमा
आणि ह्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे  परेश मोकाशी यांचा नाच ग घुमा. ह्या चित्रपटाने 27 करोड रुपये कमावले आहेत. ह्या चित्रपटात मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, नम्रता संभेराव हे कलाकार होते.

ही आहे संपूर्ण यादी

Top 10 marathi movies of 204
1. Nach ga chuka
2. navra majha baba sacha 2
3. Dharmveer 2
4. June furniture
5. Ole ale
6. Shivrayancha chhava
7. Phullwanti
8. Gharat ganpati
9. Aslyas pralhad
10.Alibaba ani chalishitale chor


तर हे होते 2024 चे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने