धर्मरक्ष छत्रपती संभाजी महाराज चित्रपट एकूण कमाई- total box office collection dharmarakshak sambhaji maharaj

धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाची कमाई

Dharmrakshak mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Movie Box Office Collection

Sambhaji maharaj marathi movie collection


ह्या शुक्रवारी मराठी बॉक्स ऑफिसवर दोन मोठे मराठी चित्रपट रिलीज झाले आहेत. एक आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महासिनेमा अर्थात धर्मरक्षक महावीर  छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरा आहे शरद केळकर, संतोष जुवेकर, संजय नार्वेकर यांचा रानटी. एक आहे छत्रपती संभाजी महाराजांची महागाथा सांगणारा ऐतिहासिक सिनेमा. जो महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करणारा करतो. हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राचा महासिनेमा आहे. 

आणि दुसरा ऍक्शनपट रानटी’ चित्रपट नावाप्रमाणे हिंसक आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने भरलेला आहे. मराठी सिनेमात आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन, जबरदस्त पटकथा हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. दोन वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट रिलीज झाले आहेत.

ह्या दोन चित्रपटांनी किती कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत. चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. ओव्हर ऑल पाहता दोन्ही चित्रपटांनी काही खास कमाई केली नाहीये. दोन्ही चित्रपटांकडून अजून चांगल्या कमाईची अपेक्षा होती पाहूया या चित्रपटांनी नक्की किती कमाई केली आहे.
 
रानटी ह्या सिनेमाचा विचार करता या सिनेमाने दिवसागणिक केलेली कमाई पुढील प्रमाणे आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 20 लाख , दुसऱ्या दिवशी 21 लाख, तिसऱ्या दिवशी रविवारी 27 लाख कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाने पहिल्या विकेंड ला फक्त 68 लाख रुपये कमावले. नंतर सोमवारी चित्रपट पूर्ण पडला. सोमवारी चित्रपटाने 7 लाख कमावले आणि मंगळवारी कमाई घसरून पाच लाखांवर आली. अशा प्रकारे पाच दिवसात चित्रपटाने फक्त 80 लाख कमावले आहेत.
 
दुसरीकडे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचा विचार करता या चित्रपटाने 35 लाख रुपयांची ओपनिंग घेतली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 55 लाख कमावले आणि तिसऱ्या दिवशी कमाई वाढून 95 लाख रुपये झाली. अशा प्रकारे पहिल्या विकेंडला ह्या चित्रपटाने एक करोड 85 लाख रुपये कमावले. सोमवारी कमाई 28 लाख रुपये झाली आणि मंगळवारी 27 लाख झाली. पाच दिवसांत ह्या चित्रपटाने दोन करोड 40 लाख कमावले आहेत.

दोन्ही चित्रपटाकडुन बऱ्याच अपेक्षा होत्या दोन्ही बिग बजेट चित्रपट आहेत. त्यामुळे चित्रपट हिट होण्यासाठी अजून चांगली कमाई करावी लागले. दोन्ही चित्रपटही चांगले बनवले गेले आहेत. आशा आहे येणाऱ्या दिवसांत कमाई वाढेल. नंतर गुरुवारी 25 लाख कमाई झाली. अशा प्रकारे चित्रपटाने पहिल्या आठवड्यात दोन करोड 92 लाख कमावले होते. तेव्हा चित्रपट पुढे कसा कमाई करेल याबद्दल काळजी लागून राहिली होती. मात्र सिनेरसिकांनी यावेळी निराशा केली नाही. दुसऱ्या आठवड्यातील कमाईचे आकडे सुखद धक्का देणारे होते.

खरी कमाई दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली. दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने तिप्पट कमाई करत 90 लाख कमावले. शनिवारी कमाई आणखी वाढून  1 करोड झाली. रविवारी बॉक्स ऑफिसवर चित्रपट हाऊसफुल झाला. आणि चित्रपटाने तब्बल 1करोड 40 लाख रुपये कमावले. अशा प्रकारे दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने फक्त तीन दिवसात 3 करोड 30 लाख कमावले. या तीन दिवसातच सिनेमाने पहिल्या आठड्याच्या  कमाईला मागे टाकले.

हाच ट्रेंड पुढे सोमवारी कायम राहिला आणि दुसऱ्या सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी अशा प्रत्येक दिवशी सिनेमाने 30 लाखाच्या वर कमाई करून हा चित्रपट लंबी रेस का घोडा आहे हे सिद्ध केले आहे.  तेरा दिवसात सिनेमाची एकूण कमाई सात करोड 25 लाख झाली आहे. चित्रपटाने फक्त 10 दिवसात फुलवंतीच्या कमाईला मागे टाकले. आता चित्रपटाने शिवरायांचा छावा चित्रपटालाही मागे टाकुन ह्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहावा नंबर पटकावला आहे. पुढे येणाऱ्या दिवसात चित्रपट अजून चांगली कमाई करून 10 करोड आणि 15 करोडचे लवकरच ओलांडणार आहे असे एकूणच ट्रेंड वरून दिसते आहे. मराठी फिल्म industry साठी ही खूप चांगली गोष्ट आहे. चांगल्या चित्रपटांना मराठी सिने रसिक डोक्यावर घेतात हे यावरून दिसून येते. आशा आहे महाराजांवर बनलेला हा सुंदर चित्रपट पुढे येणाऱ्या दिवसात रेकॉर्ड कमाई करेल.

मात्र आत्ताच प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटाने या चित्रपटाचा मार्ग रोखला आहे. चांगले स्क्रिन आणि प्राइम टाइमचे शो पुष्पा चित्रपटाला देण्यात आले आहे. म्ह्णून निर्मात्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता पुढे चित्रपट कसा चालेल अशी भीती निर्माण झाली आहे. मराठी चित्रपट चांगला चालत असूनही हिंदी आणि साऊथ चित्रपटांना स्क्रिन देण्याचा प्रकार रोजचाच झाला आहे. या चित्रपटाच्या बाबतीतही असेच घडताना दिसत आहे.

त्यामुळे पुढे चित्रपटाच्या कमाईत घट होणार आहे. हा चित्रपट निर्मात्यांसाठी फार मोठा धक्का आहे. कारण चित्रपट नुगताच गर्दी खेचत होता त्याच वेळी चित्रपटाच्या स्क्रिन कमी करण्यात आल्या आहेत. 

Total collection of dharmrakshak mahaveer chatrapati sambhaji maharaj movie


पुष्पा रीलझ झाल्यापासून चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली असून पुढील दिवासा मध्ये चित्रपटाने अनुक्रमे 18 लाख, 15 लाख , 14 लाख, 14 लाख, 16 लाख, 10 लाख ,13 लाख, 10 लाख, अशा प्रकारे चित्रपटाने 21 दिवसा मध्ये एकूण 
8.33 करोड रुपये कमावले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने