माहेरची साडी या सिनेमाबद्दलच्या ह्या अविश्वसनीय गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
माहेरची साडी सिनेमामुळे एका लहान मुलाचा जीव गेला होत
अलका कुबल यांना नाईलाजाने कमी पैशात हा सिनेमा करावा लागला. निर्मात्यानाही सुरवातीला अलका कुबल ह्या लक्ष्मी म्हणून नको होत्या. माहेरच्या साडीबद्दल अशाच जबरदस्त गोष्टींची माहिती आज ह्या लेखा द्वारे आम्ही देणार आहोत.
मराठी सिनेमाच्या इतिहासात माहेरची साडी हा सर्वात सक्सेसफुल सिनेमा आहे. 1991 साली आलेल्या या सिनेमाने कमाईचे सारे रेकॉर्ड तोडून टाकले. अवघ्या काही लाखात बनलेल्या या सिनेमाने 1991 साली 12 करोड रुपये कमावले होते. 1991 सालचा हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.
माहेरची साडी” हा चित्रपट १८ सप्टेंबर १९९१ रोजी प्रदर्शित झाला होता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे कॉमेडी सिनेमे जोरदार चालत. त्यामुळे सुरवातीला चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला.
सुरवातीला हा चित्रपट कोल्हापूर, सांगली भागात प्रसिद्ध झाला. त्यामुळे काही थिएटर मध्ये तिकिटावर लकी draw ठेवून साडया वाटण्यात आल्या. काही ठिकाणी प्रत्येक तिकिटा सोबत एक रुमाल वाटण्यात आला. यानंतर सिनेमाची positive word of mouth वेगाने पसरली. मग पुणे मुंबई इथे चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर हाऊसफुल झाला. माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपट एवढा प्रसिद्ध झाला की ग्रामीण भागातील थिएटरमध्ये प्रचंड गर्दी उसळायची. जे मिळेल ते वाहन करून लोक चित्रपट बघायला जायचे. एसटी सुद्धा तालुक्यातील थिएटरमध्ये लोकांना सोडून मग डेपोत जायची. लोक सांगतात, सिनेमाच्या थिएटरमध्ये जेव्हा कुणी मागे वळून पाहिले तर अक्षरशः अख्खं थिएटर रडताना दिसायचं.
पुण्यातील “प्रभात” चित्रपटगृहात तो तब्बल १२७ आठवडे चालला. गिरगावातील “रॉक्सी” आणि “सेंट्रल सिनेमा” अशा चित्रपटगृहांत एकूण १०१ आठवडे हा चित्रपट दाखवला जात होता. त्या वेळी तिकिटांची किंमत फक्त एक रुपये अशी होती. मात्र बॉक्स ऑफिसवर मिळविलेला या चित्रपटाने गल्ला होता बारा कोटी रुपये. याशिवाय या सिनेमाची तिकिटे सहजा सहजी मिळत नसत. लोक 10 ते 20 पट जास्त पैसे देऊन ब्लॅकने तिकिटे खरेदी करत. 1 रुपयाचे तिकीट 50 रुपयाने घेतल्याची उदाहरणे आहेत. चित्रपटाचे शो मध्यरात्री 12 वाजता तसेच सकाळी 6 वाजताची असायचे तरीही तिकीट मिळणे मुश्किल जायचे. थिएटर भरले तर लोक खाली बसून बाजूला उभे राहून चित्रपट पहायचे.
ह्या सिनेमाचे दिग्दर्शक विजय कोंडके हे सुपरस्टार दादा कोंडके यांचे पुतणे आहेत. यांनी मैने प्यार किया फेम भाग्यश्री पटवर्धन हिची लीड रोल मध्ये निवड केली होती. तिचा मैनें प्यार किया या सिनेमात भाग्यश्रीचे सोज्वळ रुप प्रेक्षकांना भावले होते. त्यामुळे माहेरची साडी या सिनेमातील सोशिक सूनेच्या भूमिकेत भाग्यश्री अगदी फिट बसेल, असे विजय कोंडके यांना वाटले होते. पण भाग्यश्री यांनी हा चित्रपट नाकारला अखेर त्यांनी भाग्यश्रीऐवजी दुस-या अभिनेत्रीला चित्रपटासाठी साइन करायचे ठरवले. अलका कुबल यांची लेक चालली सासरला या चित्रपटातील हुंडाबळी असलेल्या सुनेची भूमिका गाजली होती. त्यामुळे विजय कोंडके यांनी अलका कुबल यांना चित्रपटात घेतले. मात्र अलका कुबल यांना त्यांनी खूप कमी मानधन दिले त्यामुळे त्यांनीही सुरवातिला नकार दिला मात्र कथा आवडली म्ह्णून त्यांनी खूप दिवसानंतर होकार दिला. त्यानंतर इतिहास घडला. या चित्रपटानंतर अलका कुबल घराघरात पोहोचल्या. आजही अलका यांना 'माहेरची साडी' या चित्रपटासाठीच ओळखले जाते.
माहेरची साडी हा यशस्वी राजस्थानी चित्रपट "बाई चली ससरीये"चा रिमेक होता, ज्याचा नंतर 1994 मध्ये जुही चावला आणि ऋषी कपूर यांना घेऊन साजन का घर म्हणून हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला.
हा सीनेम बघताना थिएटर मध्ये एक धक्कादायक घटना घडली. एक गृहिणी आपल्या छोट्या मुलाला घेऊन चित्रपट बघायला आली त्यावेळी ते छोटे मूल सारखे रडायचे म्हणून तिने त्या मुलाच्या तोंडावर हात ठेवून चित्रपट पाहिला. चित्रपट पाहताना इ गृहिणी एवढी गुंग होऊन गेली की तिला स्वतःच्या मुलाचा विसर पडला. जेव्हा सिनेमा संपला त्यावेळी ते मूल गुदमरून मेले होते. ही बातमी जेव्हा अलका कुबल ह्यांना कळली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.
सिनेमाची गाणी एकापेक्षा एक सरस होती. फक्त गाणीच नाही तर सिनेमाचे डायलॉग असलेली कॅसेटही लोक घरी ऐकत बसायचे.
माहेरची साडी सिनेमाचे यश आणि नावापासून प्रेरित होऊन दादा कोंडेकनी 1994 साली सासरचे धोतर हा विनोदी चित्रपट काढला होता.
या सिनेमाने बनवलेले 12 करोडचे रेकॉर्ड तोडायला मराठी सिनेमाला 16 वर्षे लागली. 2007 मध्ये आलेल्या साडे माडे तीन या चित्रपटाने 12 करोडचा टप्पा ओलांडला.1991 सालच्या 12 करोडचे inflasion adjustment म्हणजे महागाईचा विचार केला तर ह्या सिनेमाची आजच्या दिवशीची कमाई साडे तीनशे करोड होते. एवढा हा सिनेमा धुवाधार चालला होता.
तर ह्या होत्या माहेरच्या साडी या सिनेमाबद्दलच्या काही जबरदस्त गोष्टी.