Dashavatar Marathi Movie Collection| दशावतार मराठी चित्रपट कमाई आणि रिव्हु

दशावतार चित्रपटाची दिवसा गणिक एकूण कमाई | चित्रपट पहावा की पाहू नये

Aarpar marathi movie review and collection| Bin laganachi gosht collection 

Dashavatar movie collection



या शुक्रवारी मराठीतील 'बिन लग्नाची गोष्ट', 'आरपार' आणि 'दशावतार' असे ३ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. तगडी स्टारकास्ट असलेल्या या तिन्ही चित्रपटांमुळे मराठी प्रेक्षक विभागले गेले. बिन लग्नाची गोष्ट मधून उमेश कामत, प्रिया बापट, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांची केमिस्ट्री बघायला मिळाली. तर दुसरा चित्रपट ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांच्या 'आरपार' लाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या पैकी दशावतार चित्रपटाची क्रेज वेगळ्याच लेव्हलला पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला डोक्यावर उचलून घेतले. काल म्हणजे पहिल्या दिवशी या प्रत्येक चित्रपटाने किती कमाई केली हे या आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच, त्या अगोदर दशावतार सिनेमाचा रिव्हु पाहून घेऊ.


Dashavtar marathi movie review 

दशावतार चित्रपट सपूर्ण रिव्ह्यू 


दशावतार' सिनेमाची घोषणा झाली तेव्हा पासूनच प्रेक्षकांची सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. टीझर आणि ट्रेलर पाहताना, एक वेगळ्या प्रकारचा चित्रपटअनुभवायला मिळणार असल्याने, प्रेक्षकांत कुतुहल निर्माण झालं होतं. त्यामुळे सिनेमाकडून खूप प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. चला तर पाहूया हा सिनेमा आपल्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही.
कथा
दशावतार या सिनेमाची कथा तळकोकणातील एकदशावतारी कलावंत बाबुली यांच्याभोवती फिरते. जे पात्र दिलीप प्रभावळकर यांनी साकारले आहे. त्याने आपले आयुष्य त्यानं दशावतार कलेसाठी वाहिलेल आहे. आता त्याचे वय झाले आहे. तरीही कलेवरील प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नाहीये. गावकरी पण त्याच्या हेकेखोर पणाची चेष्टा करतात मात्र त्याच्या नाट्यकले बद्दल त्यांच्या मनात आदराची भावना देखील असते.
आपल्या बापानं आता दशावतार सोडून आराम करावा, असे त्याच्या मुलाला म्हणजे सिद्धार्थ मेननला वाटत असतं. मात्र हट्टाला पेटलेला बाबुली दशावतारापासून दूर व्हायला तयार नाही. शेवटी महाशिवरात्रीच्या रथयात्रेत आपण एकदा शेवटचे पात्र रंगवून दशावतार कलेला सोडून देणार बाबुली आपल्या मुलाला वचन देतो. मात्र या रात्री, बाबुलीचे वेगळेच रूप पाहायला मिळते. तेव्हा या सिनेमाचं नाव 'दशावतार' का आहे याची प्रचिती येते. त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.
चित्रपटाची कथा पारंपरिक दशावतार कलेची असली तरी ती केवळ आख्यायिकेत रमत नाही सध्याच्या परिस्थितीला हात घालते. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे कथानकाचे दोन भाग आपल्या समोर उलगडत जातात. बाबुलीची श्रद्धा ,त्याग, आणि शौर्य याची ही कथा उत्तरोत्तर रंगत जाते. एकूणच एक चांगले कथानक या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.


अभिनय:

या सिनेमात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे ,प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे अशा एकापेक्षा एक कलाकारांनी आपली स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. बाबुलीची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी समर्थपणे साकारली आहे. वयाच्या ८१ व्या त्यांची एनर्जी, संवादफेक, अभिनय पाहणे म्हणजे पर्वणीच आहे. दशावतारी खेळात त्यांनी रंगवलेली विविध आपल्याला पात्रे थक्क करुन सोडतात. त्यांनी आपल्या भूमिकेवर घेतलेली मेहनत दिसून येते. महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर चांगला साकारला आहे वडिलांवर प्रेम करणाऱ्या मुलाची भूमिका सिद्धार्थ मेनन याने चोख बजावली आहे. बाकी इतर कलाकारांनीही आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. त्यामुळे उत्तम अभिनय म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हा सिनेमा नक्की पाहायलाच हवा.

दिग्दर्शन:

सुबोध खानोलकर यांनी 'दशावतार' सिनेमाची कथा लिहिली त्यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. कथेचा आवाका खूप मोठा आहे त्यामुळे यासाठी आवश्यक असलेला दर्जा दिग्दर्शनाचा दर्जा थोडा कमी वाटतो. लिमिटेड बजेट मुळे दिग्दर्शकाच्या वावरावर मर्यादा आल्या आहेत. कोकणची वातावरणनिर्मिती अत्यंत सुंदर तयार केली आहे. मात्र चित्रपटाची सुरुवात काहीशी संथ वाटते. काही प्रसंग जास्त ताणल्यासारखे वाटतात. मात्र मध्यंतरानंतर सिनेमा वेग पकडतो. सिनेमातले काही प्रसंग अत्यंत सुंदर जमून आलेत. यासाठी दिग्दर्शकाचे अभिनंदन केले पाहिजे. मात्र एकाचवेळी अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करताना शेवटी थोडा गोंधळ उडालेला दिसून येतो. ओव्हर ऑल दिग्दर्शन ठीक ठाक झाले आहे

संगीत आणि गाणी
 
चित्रपटातील गाणी उत्तम जमून आली आहे. विशेषतः रंगपूजा आणि आवशीचो घोव ही गाणी लक्षात राहतात. ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी चित्रपटाला समर्पक असे संगीत दिले आहे. चित्रपटाच्या संगीतात पारंपरिक आणि आधुनिक सूर यांचा संगम पाहायला मिळतो. गुरू ठाकूर यांनी लिहिलेली गाणी आणि संवाद चांगले जमून आले आहे.

छायाचित्रण आणि एडिटिंग

तांत्रिक बाबतीत सिनेमा भव्य आणि तितकाच सुंदर आहे. अत्यंत लिमिटेड बजेट मध्ये कोकणची हिरवळ, लाल माती, गावकुस, रात्रीचे गूढ वातावरण अत्यंत सुयोग्य पद्धतीने दर्शविण्यात आले आहे. एकूणच सिनेमेटोग्राफी दर्जेदार आहे. मात्र एडिटिंग मध्ये सिनेमा मार खातो. काही प्रसंग ट्रिम करून कथानक वेगवान करता आले असते.
ओव्हर ऑल बोलायचे तर 'दशावतार' हा मराठीतला एक दर्जेदार सिनेमा आहे. मराठी सिनेमाची ओळख म्हणजे दर्जेदार कथानक आणि जबरदस्त अभिनय या दोन्ही गोष्टी सिनेमात ठासून भरल्या आहेत. कथेत ती क्षमता होती तिचा पूर्णपणे वापर केला गेला नाही. कथेला शेवटी एकादी ट्विस्ट अथवा धक्का दिला असता तर चित्रपटाने वेगळी उंची गाठली असती. आपल्या अपेक्षांची पातळी गाठण्यात सिनेमा थोडा कमी पडतो. तरीही मराठी सिनेसृष्टीतला हा एक स्तुत्य प्रयत्न असून त्यामुळे निर्मात्यांची तारीफ केली पाहिजे. एक वेगळा अनुभव देणारा हा चित्रपट मराठी प्रेक्षकाने पाहायलाच हवा. त्यामुळे थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा पाहणे आवश्यक आहे. अशा मराठी सिनेमांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तरच मराठी चित्रपट सृष्टीत नाविन्यपूर्ण विषय घ्यायला निर्माते पुढे येतील. त्यातूनच आपली प्राचीन संस्कृती आणि कला याची जगाला ओळख होईल. 

एकूणच या आम्ही देतोय या सिनेमाला पाच पैकी ४ स्टार. 


Dashavtar marathi movie daywise collection 

दशावतार चित्रपटाची कमाई

दशावतार या सिनेमाबद्दल बोलायचे तर सिनेमाची घोषणा झाली तेव्हा पासूनच प्रेक्षकांची सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सिनेमाच्या जबरदस्त टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांत खूप मोठे कुतुहल निर्माण केले होते. यामुळे दशावतार सिनेमा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी मुंबई, पुण्यातील अनेक थिएटर हाऊसफुल्ल होते. पहिल्या दिवशी सिनेमाने वर्किंग डे असूनही तब्बल ७० लाख रुपयाची ओपनिंग दिली. अशा प्रकारे दशावतार हा सिनेमा या वर्षीचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. 
या वर्षी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाने केली होती. त्याने पहिल्या दिवशी ६० लाख कमावले आहेत. दशावताराने हा रेकॉर्ड मोडला आहे.
दशावतार चित्रपट लोकांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियावरही सर्वजण चित्रपटाची तारीफ करत आहेत. चित्रपटाची  word of mouth सुद्धा positive आहे. चित्रपट समीक्षकांनी या सिनेमाला चांगले रिव्हु दिले होते.
शुक्रवारी १२ सप्टेंबर ला दशावताराचे ५०० शो लावण्यात आले होते. मात्र सिनेमाची मागणी प्रचंड असल्यामुळे शो कमी पडले. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकले. काही प्रेक्षकांना तिकिटे मिळाली नाहीत. शेवटी अनेक लोकांनी निर्मात्यांना शोज वाढवायची विनंती केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाचे शोज मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. ५०० शो वरूनहा आकडा 800 एवढा झाला तरीही तिकिटांची मारामार झाली. रविवारी सिनेमाचे शो पुन्हा वाढवण्यात आले. रविवार पासून आता सिनेमा तब्बल १००० शो वर तुडुंब गर्दी खेचत आहे.थिएटर मालकही मराठी चित्रपटांना प्राधान्य देत शोज वाढवतात हे दिसून येत आहेत.
 सर्वत्र चित्रपट हाऊसफुल चालला. मुंबई पुणे आणि कोकणी भागात तर अनेक लोकांना तिकिटे मिळाली नाहीत. 
केवळ मुंबई-पुणे ,कोकण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे बेळगाव, बेंगळुरु, इंदौर, हैद्राबाद आणि गोव्यातही हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आहे.

शनिवारी चित्रपटाने शुक्रवारच्या तुलनेत डबल पेक्षा जास्त कमाई केले आहे. शनिवारी चित्रपटाने तब्बल १ करोड ६० लाख रुपये कमावले आहेत. अशा पहिल्या दोन दिवसातच सिनेमाने २कोटी ३० लाख रुपये कमावले आहेत. 
या वर्षी एका दिवसात एक करोड रुपये कमावणार दशावतार हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे.
रविवारीही चित्रपटाने बंपर ओपनिंग घेतली असुन सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड झळकले आहेत. अनेक लोक निर्मात्यांना चित्रपटाचे शोज वाढवायची विनंती करत आहेत. निर्मात्यांनीही प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता शोज ची संख्या वाढविली आहे. त्यामुळे रविवारीही चित्रपटाची कमाई खूप मोठी ठरली आहे. रविवारी चित्रपटाने तब्बल २ करोड ६० लाख रुपये कमावले आहेत. त्यामुळे पहिल्या तीन दिवसात सिनेमाने 5 करोड रुपये कमावले आहेत.
पुढे सोमवारी चित्रपट कसा कमावतो या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. Monday टेस्ट मध्येही सिनेमाने बाजी मारली आहे. वर्किंग डे आणि कमी झालेले तिकिटाचे दर असूनही सिनेमाने १ करोड २० लाख रुपये कमावले आहे. शुक्रवार पेक्षा सोमवारची कमाई जास्त ठरली ही चांगली गोष्ट असून सिनेमा अनेक दिवस थिएटर मध्ये ठाण मांडून बसणार आहे हे पक्के ठरले आहे. मंगळवारी काही ठिकाणी शंभर रुपयांच्या खाली तिकीट असूनही कमाईवर काहीच परिणाम झाला नाही. उलट सोमवार पेक्षा मंगळवारी तिकिटवविक्री जास्त झाली आहे. मंगळवारी चित्रपटाने १ करोड ३० लाख रुपये कमावले आहेत. अशा प्रकारे सिनेमाने पहिल्या पाच दिवसात साडेसात करोड पर्यंत मजल मारली आहे. सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी हा चित्रपट जारण या सिनेमाच्या कमाईला मागे टाकून यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरणार आहे. यावरून या सिनेमाची कमाईचा तुम्हाला अंदाज येईल. 
पहिल्या तीन दिवसातच सिनेमाने आपले चार करोडचे बजेट वसूल केले. फक्त चार दिवसात सिनेमा सुपरहिट झाला असून. अशीच कमाई चालू राहिली तर सिनेमाला ब्लॉकबस्टर होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. 

मराठी चित्रपट सृष्टीसाठी ही खूप चांगली बाब आहे. कारण या वर्षी मराठी चित्रपटांची कमाई खूप साधारण राहिली आहे. टॉप ३ चित्रपट पाहिले तर जारण , गुलकंद आणि आता थांबायचं नाही या तीन चित्रपटांची कमाई आठ करोड च्या आसपास राहिली आहे. दशावतार सिनेमाची क्रेझ बघता हा सिनेमा दहा करोडचा टप्पा सहज गाठू शकतो.

Dashavatar day wise collection 

1at day collection -         70 lacs

2nd day collection -1cr. 70 lacs

3rd day collection - 2cr. 60lacs 

4th day collection - 1cr. 20lacs

5th day collection  - 1cr. 30lacs 

Total collection -   7cr. 50 lacs (5days)


Aarpar marathi movie collection| Bin lagnachi goshta marathi movie collection 


12 सप्टेंबर रोजी 'दशावतार'सह तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटांचाही समावेश होता. या चित्रपटांचीही कमाई आपण सविस्तर जाणून घेऊ.
शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाने १० लाख रुपयांची कमाई केली होती. शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे या सिनेमाने २० लाख आणि ३० लाख कमावले. नंतर सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी सिनेमाची कमाई १० लाख राहिली. अशा प्रकारे या सिनेमाने आतापर्यंत ८० लाख कमावले आहेत. 

आरपार या चित्रपटाने तुलनेत बरी कमाई केली आहे. शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला या चित्रपटाने 1४ लाखांची कमाई केली होती. शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने अनुक्रमे चित्रपटाने २६ लाख आणि ३५ लाख कमावले आहेत. नंतर सोमवारी आणि मंगळवारी या चित्रपटाची सुद्धा कमाई १० लाखाच्या आसपास राहिली. अशाप्रकारे आत्तापर्यंत या. सिनेमाने एकूण ९५ लाखांची कमाई केली आहे. 
या दोन्ही सिनेमांना दशावतार शी टक्कर घेणे महागात पडले आहे. त्यामुळे चांगले रिव्हु असूनही प्रेक्षकांनी या सिनेमांना डावलून दशावतार कडे आपला मोहरा वळवला आहे. साधारण दोन अडीच करोड बजेट असलेले हे सिनेमे फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने